ऑफर

अक्षयतृतीया प्रीलॉंच ऑफर

अक्षयतृतीया प्रीलॉंच ऑफर – केवळ २१ रू. प्रती स्क्वे.फू. २५,०००/-रू. बुकींग कर

( कोकणातील फार्महाऊससह कृषिउद्योजकतेसाठी शेतजमीन खरेदी उपक्रम )

आम्ही कोकणातील फार्महाऊसाठी आणि त्याचेसोबतच्या आनंदी स्वच्छंदी शेतीविकसनासाठी ५ गुंठे आणि १० गुंठे शेतजमीन रोडटच, वीज, पाणी या सोयींसह गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देतो. याशिवाय कृषिउद्योजकतेसाठी व वनशेतीसाठी किमान २ एकर व त्यापटीत शेतजमिनी उपलब्ध करून देतो. जमीनमालक तुम्ही व विकसक आम्ही ही आमची योजना आहे. आमच्या फर्मची प्रीलॉंच ऑफर सादर करीत आहोत. संपर्क प्रो.प्रा. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई – मोबा. व्हॉटसअप - 8275134762 किंवा 7083001675 आमचे सहभागी भागीदार डॉ. प्रदिप आठवले – डोंबिवली महाराष्ट्र – मोबा. 9881478889 )

@ फार्महाऊससाठी किमान ५ गुंठे ( ५,४४५ स्क्वेअरफूट ) आणि १० गुंठे ( १०,८९० स्क्वेअरफूट ) किंवा त्यापटीत खरेदी आवश्यक ( २१/-रू. प्रती स्क्वे.फू. म्हणजेच २२,८६९/-रू. प्रतीगुंठा प्रीलॉंच ऑफर दर आम्ही जाहीर करीत आहोत. विकसनाचा खर्च ज्याचे त्याने करावयाचा असेल )

@ कृषिउद्योजकता - फलोत्पादन फार्महाऊस अर्थातच “ संडे फार्मर ” स्कीम योजनेसाठी किमान १ एकर तर वनशेतीसाठी किमान २ एकरची गुंतवणूक आवश्यक ! ( बुकींग प्रीलॉंच ऑफर दर अनुक्रमे १५ रू, ११ रू राहतील अनुक्रमे ६,५३,४००/-रू प्रतीएकरी व ४,७९,१६०/-रू. प्रतीएकरी दर राहतील. )

नियम आणि अटी

  • कोकणबाग निवांत निवास फार्महाऊस योजनेसाठी किमान २५,०००/-रू. अक्षरी पंचवीस हजार रू. मात्र बुकींग आवश्यक ( सदर रक्कम कॅन्सलेशन झाल्यास तत्काळ रिफंडेबल व नॉन कॅन्सलेशन चार्जेससह परतावा. रक्कमेची पोचपावती देताना या अटीवरच बुकींग स्विकारले जाईल, मर्यादित बुकींग घेणार )
  • अक्षयतृतीया ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणा-यांना खरेदीखताच्यावेळी स्टॅंपड्यूटी व रजिस्ट्रेशन चार्जेस फ्री असतील. ( नियम व अटी लागू )
  • जमीन बुकींग करणा-यांसाठी शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर ते काढून दिले जाईल. ( अतिरीक्त शुल्क व आकार लागू राहील. )
  • आमच्या विकसीत प्रकल्पांच्या भेटीसह विकसीत जमीनी व आमच्या प्रकल्पस्थळाला भेट देऊनही समाधान न झाल्यास व आमची जागा व आमच्या कार्यपद्धती आपणाला पसंत न पडल्यास बुकींग रक्कम तत्काळ परतावा कोणत्याही रद्दीकरण शुल्काशिवाय मिळेल.

अक्षयतृतीया प्रीलॉंच ऑफर – तपशील व माहिती

कोकणातील राजापूर तालुक्यातील आमच्या नियोजित असलेल्या ३ नव्या प्रकल्पांसाठी आम्ही शुभारंभपूर्व सवलत योजना नांवनोंदणीसाठी जाहीर केलेली आहे. १) कोकणबाग निवांतनिवास ही पाच व दहा गुंठे जमीन खरेदी करून फार्महाऊससहीत स्वच्छंदी आनंदी प्रयोगशील शेतीविकास करण्यासाठी योजना, २) कोकणबाग फलोत्पादन कृषिउद्योजकता विकास योजना – कोकणातील सुपीक कसदार मातीत फलोत्पादनासह व्यावसायीक दर्जाची शेती करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्याची योजना ३) वनशेतीसाठी जसे बांबूशेती, खैरलागवड सागवान वगैरे यासाठी पडीक वरकस जमीन खरेदी योजना आहे.

आमच्या योजनेला प्रतिसाद देणा-या व स्वारस्य दर्शवणा-या इच्छुकांनी खालील तपशीलाचे अवलोकन करावे ही विनंती.

प्रकल्पाचे स्थळ ( लोकेशन )

( या तीनही प्रकारातील जमिनींचे निवडक फोटो आमच्या संकेतस्थळावर पहावयाला मिळतील ) १) फार्महाऊस – कोकणबाग निवांत-निवास

मुक्काम आडवली गाव ( सौंदळ गावाजवळ ) तालुका – राजापूर, जिल्हा – रत्नागिरी. पीनकोड – 416704.

२) कोकणबाग – फलोत्पादन कृषिविकास कृषिउद्योजकता योजना

मुक्काम ओशीवळे गाव, रायपाटण गावाजवळ, तालुका – राजापूर, जिल्हा – रत्नागिरी. मुक्काम – कोळवण, ता. राजापूर, जिल्हा – रत्नागिरी.

३) वनशेती, जंगलशेती योजना

मुक्काम ओशीवळे गाव, रायपाटण गावाजवळ, तालुका – राजापूर, जिल्हा – रत्नागिरी. मुक्काम – कोळवण, ता. राजापूर, जिल्हा – रत्नागिरी.

जमिन ज्या ठिकाणी आहे ते गांव – ओशिवळे, आडवली, कोळवणखडी.

( तलाठी सजा परटवली, रायपाटण, ता. राजापूर, जिल्हा – रत्नागिरी )
जवळचे मोठे शहराप्रमाणे असलेले गाव – पाचल, रायपाटण.
नजिकचे रेल्वे स्थानक – राजापूर रोड ( नियमित स्थानक ) 8 कि.मी.
विलवडे – ( नियमित स्थानक ) 14 कि.मी. व नजिकच पॅसेंजर हॉल्ट सौंदळ हे स्थानक
सौंदळ हे सध्या हॉल्ट स्थानक म्हणून विकसीत झाले आहे. पुढे ते नियमित स्थानकात लवकरच रूपांतरीत होणार आहे.

विशेष टीप – आमच्या नियोजित या कोकणबाग प्रकल्पापासून 18 कि.मी. वर असलेले वैभववाडी हे स्थानक लवकरच भव्य जंक्शन बनणार आहे. वैभववाडी स्थानकातूनच पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहे.

जवळचे मोठे शहर – कोल्हापूर, रत्नागिरी.

कोल्हापूर – कोल्हापूर शहर केवळ 80 कि.मी. अंतरावर आहे.
रत्नागिरी – हे जिल्ह्याचे शहर 85 कि.मी. वर आहे.
या शिवाय राजापूर शहर 30 कि.मी, लांजा तालुका शहर 25 कि.मी. अशी शहरे जवळच आहेत.

दळणवळणाची साधने व रस्ते – मुंबई गोवा महामार्ग व बसेस, विमान.

आमच्या परिसराला जोडणारे रस्ते अत्यंत चांगले आहेत. काही महिन्यातच मुंबई गोवा महामार्ग चौपदरी होत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे या विमानतळावरून निघालेला प्रवासी रात्री दिवसादिवशी आपल्या शेतावरती येऊ शकतो. आमच्या या नियोजित कोकणबागेपासून 19 कि.मी. अंतरावर मुंबई गोवा महामार्ग आहे. या ठिकाणावरून सर्व आराम बसेस आपणाला मिळतात ज्या मुंबईला जातात. कोल्हापूर विमानतळ सुरू झालेला आहे तर चिपी विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मी स्वतः विविध विमानतळांवरून कोल्हापूर, गोवा मुंबई येथे येऊन जास्तीत जास्त लवकर शेतावर येण्याचे प्रयोग केलेले आहेत.

आपणाला आमच्या नियोजित प्रकल्पांबद्दलची माहिती वेबसाईटवरून घेता येईलच, आपण थेट आमच्याशी बोलु शकता व तपशील मागवू शकता.

७-१२ आणि कायदेशीर महसूली कागदोपत्री तपशील

आम्ही आमच्या अक्षयतृतीया ऑफरमध्ये जाहीर केलेल्या व जाहिरात केलेल्या जमिनींचा कागदोपत्री व 7-12 सदराचा महसूली तपशील खालीलप्रमाणे असेल. आमच्याकडे आलेल्या ग्राहकाने खात्रीशीर स्वारस्य दर्शवल्यानंतर आणि प्राथमिक बुकींग २५,०००/-रू. भरून केल्यावर आम्ही संबंधित 7-12 आणि आवश्यक ती कागदपत्रे संबंधित ग्राहकाला मेलवर पाठवू शकतो.

१)आम्ही ज्या जमिनीवर आमची योजना साकार करीत आहोत ती जमीन बोजाविरहीत, कर्ज किंवा कोणत्याही कर्जाला जामीन, गहाणवट नसलेली, क्लीअर टायटल जमीन असेल.

२)संबंधित जमीनमालक आणि खरेदीदार या दोहोंमध्ये निर्विवाद खरेदीखत करून देण्याची जबाबदारी नवजीवन ऍग्रोचे प्रोप्रायटर श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांची असेल.

३)विक्रीसाठी किंवा आमच्या योजनेसाठी असलेल्या जमीनीचा 1956 सालापासूनचा 7-12, 30 वर्षापासूनचा शोध अहवाल, वर्तमानपत्रातील १५ दिवसांची मुदत देऊन केलेली जाहिरात व त्यानंतरचे वकीलांचे नाहरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे संबंधित ग्राहकाला खरेदीखत करण्यापूर्वी पहायला मिळतील.

४)नवजीवन ऍग्रो या फर्मच्या माध्यमातून प्रोप्रायटर श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांनी उपलब्ध केलेली प्रकल्पासाठीची जमीन ही मूळ जमीनमालकांना किमान २५% ते ४०% इसारा, आगाऊ रक्कम देऊनच आमच्या फर्मने ताबा घेतलेला असतो, त्या जमिनीवर आमच्या फर्मची निर्विवाद वहिवाट असते याची नोंद घ्यावी.

५)आमच्या फर्मच्या प्रोप्रायटर असलेल्या श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांचेकडून अधिकृत शासकीय यंत्रणा दुय्यम निबंधक, महाराष्ट्र शासन यांचेकडे काही वेळेला शासकीय नोंदणीकृत मुखत्यारपत्र केलेले असते याची नोंद घ्यावी ही विनंती. आम्ही आमच्या ग्राहकांच्या माहितीसाठी नमूद करू इच्छितो की नोंदणीकृत खरेदीखत करताना मूळमालक आणि खरेदी घेणार यांच्यात शासकीय नोंदणीकृत खरेदीखत शासनाची आवश्यक ती विहीत केलेली स्टॅंपड्यूटी भरून कागदपत्र नोंद केले जातील.

६)आम्ही आमच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करीत असलेल्या जमीनी आम्ही नवजीवन कोकणबाग या आमच्या नेमलेल्या फर्मच्या वकीलांकडून खात्री करून घेतलेल्या जमीनी असतात. अंतीम खरेदीखत होताना किंवा खात्रीशीर व्यवहार होताना आवश्यक तेथे आमच्या फर्मच्या माध्यमातून आवश्यक ती कागदपत्रे ग्राहकांच्या माहितासीठी किंवा अवलोकनासाठी दिली जातील.

७)आम्ही नमूद करू इच्छितो की आम्ही आमच्या जमिनींची कागदपत्रे खात्रीशीर स्वारस्याशिवाय समाजमाध्यमांतून किंवा सोशल साईटवरती किंवा व्हॉटसअपच्या माध्यमातून देवाणघेवाण केली जाणार नाहीत. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जमीनींची कागदपत्रे प्रत्यक्ष जमीन पाहिल्यावर आणि संम्मती देऊन खरेदीसाठी सज्जता दर्शवल्यावरती द्यावयाची असतील.

८)आमच्या ग्राहकाला निर्वेध व खात्रीशीर ७-१२ बनवून त्यांच्या नावे जमीन करून देईपर्यंतची जबाबदारी आमच्या फर्मची असते व ती आम्ही आजवर प्रत्येक ग्राहकाला करून दिलेली आहे. आमच्याकडून ज्या ग्राहकांनी चौकशी करून स्वारस्य दर्शवले आहे त्या ग्राहकांनी आमच्या अन्य ग्राहकांचे ७-१२ महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर पाहून खात्री करून घ्यावी.

९)आमच्याकडे चौकशी करणा-या ग्राहकांनी कृपया लक्षात घ्यावे की आम्ही खरेदी केलेल्या जमीनींसंदर्भात एखादा व्यवहार बराचसा पूर्ण झालेला असला किंवा आर्थिक देवाणघेवाण पूर्ण झालेली असली तरी जमीनमालक आणि आम्ही एकाच गावातील असल्याने किंवा परस्परांचे शेजारी व आमचे सौहार्दाचे संबंध असल्याने त्यासंदर्भातील करार हा तोंडी असतो व त्या आधारावरतीच आमच्या ग्राहकांना आम्ही त्यांच्या कागदोपत्रांच्या पूर्ततेवेळी मूळ जमीनमालक हजर करूनच व्यवहार पूर्ण करून देतो. शासनाला दोनदोनदा नोंदणीशुल्क देणे व्यावहारीकदृष्टया परवडणारे नसते याची नोंद घ्यावी.

( विशेष नोंद – जमीन खरेदी करताना अनेकदा अनेक ग्राहकांना अनेक ठिकाणी काही विचित्र अनुभव आलेले असतात, काहीवेळा अन्यत्र फसवणूक झालेली असते, काहींनी तशा बातम्या वाचलेल्या असतात, काहींना त्यांच्या नातेवाईकांचे तसे अनुभव ऐकायला मिळालेले असतात, कृपया नोंद घ्यावी की आम्ही अशा घटनांचा निषेध करतो, आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुखद अनुभव द्यायला कटीबद्ध आहोत. आम्ही सेवा पुरवठादार असल्याने आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती अवलंबून त्यांचे समाधान आणि त्यांचा आनंद यातच आमचीही विश्वासार्हता जपत असतो. )

ग्राहकाचे शेतकरी प्रमाणपत्र

आमच्याकडे किंवा महाराष्ट्रात कुठेही शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, आमच्याकडे चौकशी करणा-या ग्राहकांनाही आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांनी त्यांचे शेतकरी प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता असेल. याशिवाय या प्रमाणपत्राबद्दल खालीलप्रमाणे तपशीलाची नोंद घ्यावी ही विनंती.

अ) शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकाने पती किंवा पत्नी यांचे शेतकरी प्रमाणपत्र सादर केले पाहिजे. या दोहोंचेही प्रमाणपत्र नसल्यास आपण आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, ( जसे आई किंवा बाबा )

ब) आपल्याकडे शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर आम्ही आमच्या सेवेमार्फत शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त करून देऊ शकतो.

क) शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी किमान पन्नास हजार ते जास्तीत जास्त एक लाख रूपये खर्च येतो, किमान ३० दिवसात शेतकरी प्रमाणपत्र काढता येते.

ड) शेतकरी प्रमाणपत्र हा गुंतागुंतीचा विषय असल्याने आमच्या ग्राहकाने स्वारस्य दर्शवल्यावरती याबाबतीत वस्तुस्थिती सांगितल्यावर आमचे सहकार्य ग्राहकांना आम्ही करत असतो.

ई) आमच्याकडे फार्महाऊस कोकणबाग निवांतनिवास योजनेत किमान पाच ते दहा गुंठे जागेची खरेदी करावयाची असेल तर बिनशेती जमीन करावयाची असल्याने यासाठी शेतकरी प्रमाणपत्राची अट राहणार नाही.

फ) सलग तीन वर्षे शेतकरी प्रमाणपत्र धारण केल्यावरती सदर प्रमाणपत्र काही अटींवर हस्तांतरणीय राहील.

बिनशेती प्रमाणपत्र व रेरा परवानगी व इतर

आमच्या ग्राहकांनी कृपया लक्षात घ्यावे की आम्ही प्रीलॉंच योजना जाहीर करत आहोत. या अक्षयतृतीयेपर्यंत म्हणजेच दिनांक २६ एप्रिल २०२० पर्यंत किमान काही ग्राहकांच्या खात्रीशीर स्वारस्यानंतरच कागदोपत्री कामकाजाला सुरूवात करावयाची आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती खालीलप्रमाणे असेल.

१) कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॉटस व रेरा तसेच अन्य सर्व परवानग्या यासहीत प्रस्ताव पूर्ततेसाठी कमाल पाच ग्राहकांचे खात्रीशीर स्वारस्य आम्हाला आवश्यक आहे.

२) आमच्याकडे आमच्या प्रीलॉंच ऑफरमध्ये किमान तीन ग्राहक जरी तयार झाले तरी आम्ही आमच्या प्रस्तावाला कागदोपत्री पूर्ततेसाठी सादर करणार आहोत.

३) आम्ही आमच्या कोकणबाग निवांतनिवास योजनेसाठी २.५ एकर मोक्याची आणि रस्ता, वीज, पाणी अशा प्राईम लोकेशनची जमीन निश्चित केलेली आहे.

४) आम्ही आमच्या योजनेत मर्यादित आणि निवडक ग्राहकांनाच प्रवेश देणार आहोत.

नवजीवन सपोर्ट सेवा व सल्ला व देखभाल शुल्क

आमच्या फर्मच्या विविध सेवा आणि आमची कार्यपद्धती याबद्दल आमच्या संकेतस्थळावरती आपण विविध प्रकारची माहिती घेतलेली असेलच. आपण नियम आणि अटी यासहीत नेहमीच विचारले जाणारे प्रश्न याबद्दलही माहिती घ्यावी व आमच्या संकेतस्थळावरती दिलेला तपशील पहावा ही विनंती आहे. आमच्या ग्राहकाने खरेदी केलेली जमीन किंवा फार्महाऊस पडीक राहू नये, सेवेअभावी मालमत्तेचे नुकसान होऊ नये ही आमची इच्छा असते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती हा आमचा उद्देश असल्याने आम्ही जास्तीत जास्त चांगल्या सेवा नेहमीच पुरवीत असतो. सध्या आमच्याकडून ११ ग्राहकांना सेवा पुरवठा दिला जात आहे.

आम्ही पुरवीत असलेल्या सेवांची यादी व सल्ला सेवा शुल्क खालीलप्रमाणे

१) लागवड, पीक निर्मिती व मशागत यासाठी कामगार पुरवठा

२) काढलेल्या पीकांसाठी बाजारभावानुसार विक्री व व्यवस्थापन व प्रक्रिया करून मालाची विक्री करणे.

३) शेतासाठी रखवालदार आणि देखभालीसाठी मजूर पुरवणे.

४) फार्महाऊस बांधकाम, कुंपण तयार करणे. विहीर खोदणे, फलोत्पादन बागेची निर्मिती, वनशेती, जंगलशेती, शेतीसाहित्य खरेदी वगैरे.

५) आमच्या सल्ला व सेवा पुरवठा याबाबतीत सल्ला व सेवा शुल्क याची आकारणी कामाच्या स्वरूपानुसार असते. आमच्या सेवा व सल्ला याबाबतीत रेडीमेड व लगेचच सांगता येईल असे कोष्टक नसले तरी प्रकल्पाच्या कामाच्या आवाक्यानुसार आमची या विषयात व प्रकल्पात वेळेची व शारिरीक गुंतवणूक किती होते त्यावर आमचे सल्ला सेवा शुल्क अवलंबून असते.