आमच्याबद्दल

आम्ही कोकणबाग ऍग्रोफार्म्स प्रा.लि. या नोंदणीकृत प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कार्यरत आहोत. आम्ही सलग दहा वर्षे मालमत्ता निवड आणि विकसन व देखभाल व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत आहोत. ( आम्ही यापूर्वी नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस ऍन्ड कन्सल्टन्सी ) या नावाने कार्यरत होतो. आमच्या कामकाजाचा पसारा आणि कार्यकक्षा वाढल्याने आम्ही आमच्या खाजगी व्यक्तिगत फर्मचे प्रा.लि. कंपनीत नोंदणी करून भारत सरकारच्या कंपनी मंत्रालय विभागाची मान्यता व परवानगी घेऊन कामकाजाला सुरूवात केली आहे. आम्ही रायपाटण या राजापूर तालुक्यातील गावात कार्यरत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यायाने कोकणात आमच्याप्रमाणे सेवा देणारी कदाचित ही आमची पहिलीच अशी नोंदणीकृत कंपनी असेल असे आम्हाला वाटते. कोकणात शेतजमीन खरेदी, बागायती जमीनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रॉपर्टी निवड करून देणे, खरेदी केलेल्या शेतजमीनीचे व्यवस्थापन व देखभाल करून देणे ही कामे आम्ही सशुल्क आणि वार्षिक कराराने करतो. आमच्या कंपनीकडे यासाठी आवश्यक त्या प्रकारचे व्यवस्थापन आहे.

स्वतःचे बलस्थान म्हणजे आंबा व काजू या नगदी पीकांसह कोकम ( रातांबा ), नारळ, चिकू या पीकांसह अननस, पपया, मसालापीके आदी विविध उत्पादनक्षम बागांची निर्मीती करून ज्यांना स्वमालकीची बाग किंवा उत्पादक बगीचा साकार करावयाचा असेल त्यांना त्यांच्य़ा मनाप्रमाणे बागबगिचा साकार करून देणे हे आमच्या कंपनीचे मुख्य काम आहे.

brochureimg

ग्राहकासाठी शेतजमीन / फळबाग, बागायत क्षेत्र खरेदी करून देणे.

कोकणबाग ऍग्रोफार्म्स प्रा.लि. कंपनी आपल्या अनुभवी संचालकाच्या आणि सहका-यांच्या माध्यमातून कंपनीकडे आलेल्या इच्छुक गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार जमीनजागा, बागायत, फळबाग क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. कोकणबाग ऍग्रोफार्म्स प्रा.लि. कंपनी ग्राहकाच्या बजेटनुसार, अपेक्षेनुसार शेतजमीन आमच्या चालू असलेल्या प्रकल्पात देऊन फार्महाऊस आणि उत्पादक शेतजमीनीचे स्वप्न आम्ही साकार करतो. आम्ही आमच्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात काही फळबागा, काही शेतजमिनी अंशतः गुंतवणूक करून उपलब्ध केलेल्या आहेत. आमची कोकणबाग कंपनी सर्वप्रकारचे कायदेशीर मदत ते खरेदी करून आमच्याकडे आलेल्या ग्राहकाला 7-12 त्यांच्या नावे करून देऊन मालकी हस्तांतरीत होईपर्यंत सहकार्य करते. आमच्याकडे आलेल्या ग्राहकाला विनासायास मनपसंत प्रॉपर्टी प्राप्त करून देण्यासाठी निवड करून देणे या आमच्या मुख्य कार्यात आम्ही कार्यरत आहोत.

चौकशी
farm-land
farm-land-care

ग्राहकाच्या जागेचा विकास, देखभाल, निगा आणि व्यवस्थापन करणे

आमच्या कोकणबाग ऍग्रोफार्म्स प्रा.लि. कंपनीकडून ग्राहकाला त्यांनी खरेदी केलेल्या शेतजमीनीचा विकास करून देणे, कुंपण, विहीर, वीज घेण्यापासून ते लागवड करून देण्यापर्यंतची कामे सशुल्क करून दिली जातात. आम्ही या कामकाजानंतर खरेदी केलेल्या मालमत्तेची वार्षिक करारावरती देखभाल आणि निगा राखण्यासाठी करार करून कामकाज करतो. आमच्या कोकणबाग कंपनीकडे विविध प्रकारचे कंत्राटदार आणि कुशल व अकुशल मजूरांची उपलब्धता अशाप्रकारची कामे करण्यासाठी आहे. आम्ही फार्महाऊस बांधून देण्यापासून ते लागवड, विकसन आदी कामे वेळेवर पूर्ण करून आमच्या ग्राहकाला ताबा देतो. आम्ही अशाप्रकारची कामे आमच्या ग्राहकाच्या गैरहजेरीतही करून देऊन सातत्याने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची देखभाल करण्याचे काम करीत असतो.

चौकशी

शेतमालाचे मार्केटींग आणि मूल्यवर्धन करणे

आमची कोकणबाग कंपनी शेतमालाचे मूल्यवर्धन करते. आम्ही मॅंगोपल्प, आंबा फळापासूनची विविध उत्पादने, कोकणबागेतील विविध फळांपासूनची सरबते, जॅम, जेली, मुरवलेले पदार्थ, मसालापीके व मसाल्यांपासूनचे पदार्थ, काजूगर आणि काजूपासूनचे पदार्थ आमच्या कंपनीच्या ब्रॅंड लेबल नावाने आम्ही बाजारात विक्री करत असतो. आम्ही आमच्या ग्राहकाच्या शेतातील शेतमालाचे मार्केटींग करण्याला प्राधान्य देतो. आम्ही आमच्या ग्राहकाचा शेतमाल ग्राहकाची संम्मती असल्यास हमीभावाने खरेदी करतो.

चौकशी
product-marketing

कोकणबाग ऍग्रोफार्म्स – मिशन

व्हीजन स्टेटमेंट – स्वप्न हंड्रेड एकर्स क्लबचे

  • "१०० एकर क्षेत्रावर व्यावसायिक पद्धत्तीने व तंत्रज्ञानाने समृद्ध अशी स्पाईस गार्डन –हायटेक हायरिटर्न्स बेस्ड-‘कोकणबाग’ निर्मिती करणे"
  • "गावातील स्थानिक बेरोजगार, महिला,"कंत्राटदार व शेतकरी यांना सोबत घेऊन शेतमालाची निर्यात करणे"
  • "शेतकरी सदस्यांना सोबत घेऊन फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीच्या माध्यमातून स्थानिक शेतकरीवर्गाचा विकास करणे"

कोकणबाग ड्रीमव्हीजन

कोकणात जमीन खरेदी करणा-या गुंतवणूकदारांना विकसीत शेत आणि कृषिउत्पादक मॉडेल तयार करून देऊन, फार्महाऊस विकसनासह करमुक्त उत्पन्नाची शेती करून नगदी आणि किफायतशीर शेती विकासाचे मॉडेल नवजीवन ऍग्रोच्या सपोर्ट सेवेतून विकसीत करून देऊन कोकणबाग उपक्रमाचा विस्तार करणे. आम्ही यासाठी एकाच जागी सर्व सुविधा असलेली ३० एकर जमीन राजापूर तालुक्यात या विकसनासाठी निवड केलेली आहे.

यशोगाथा / अभिप्राय रक्ताला ओढ मातीची !

शेकडो टन सोन्याच्या दाण्यांमध्ये चार बिया रुजत घातल्या तर लसलासणारे कोंब घेऊन चार अंकुर सुद्धा उगवत नाहीत. मी याबद्दल जाणून होते. मी भोपाळ (मध्य प्रदेश) येथून श्रीम. स्मिता वसंत शेंड्ये माझा अभिप्राय किंवा छोटीशी यशोगाथा आपल्या समोर ठेवत आहे.

माझे पती कै. वसंत शेंड्ये आणि मी स्वतः एका दिवाळीत दिपावली अंक मौज वाचन करत असताना अशाच आशयाचा एक लेख आमच्या वाचनात आला. आम्ही आमची कोकणशी मुळापासूनची असलेली नाळ तोडायची नाही तर पुन्हा जोडायची असे ठरवून एक छोटासा जमिनीचा तुकडा खरेदी करायचा असे ठरवले. आम्ही यासंदर्भाने श्री. महेश पळसुलेदेसाई यांचेशी चर्चा केली. आमच्या शंका आणि चर्चा तसेच प्रश्नावली पुढे वाढत वाढतच गेली. आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे एक छोटीशी आंब्याची टुमदार आमराई आम्हाला कोकणबाग यांचेकडून मिळाली. आम्ही या आमराईतील हापूसच्या पेट्या मिळवल्या. आम्हाला आमच्या नातेवाईकांना हापूसपेट्या सप्रेम भेट देता आल्याच शिवाय आम्हाला शासकीय योजनांचा लाभही मिळाला.

आज आमच्या कुटुंबात कै. वसंत शेंड्ये नाहीत परंतु आम्हाला आमच्या स्वप्नात असलेली आमराई मिळाली, आम्ही पुढे त्यानंतरही 2 एकर जमीन खरेदी करून एक बांबूची बाग तयार केली. आमचे दोन्ही जमीनखरेदीचे अनुभव अत्यंत सुखावह ठरले. आम्हाला आमच्या जमीनींची देखभाल आणि व्यवस्थापन कोकणबाग यांचेकडून करून दिले जाते. आम्हाला आंब्याच्या बनात बांबूच्या वनात वावरण्याचा आनंद मिळाला. आम्ही आज कुणालाही कोकणबाग ऍग्रोफार्म्सचे नाव सुचवतो ते यामुळेच!

पूर्ण झालेले प्रकल्प