कोकणबाग – कोकणलॅन्ड


जमीन मालक तुम्ही व विकासक आम्ही – पैशाला सुगंध मसाल्याचा

जमिन मालक तुम्ही आणि विकसक आम्ही या आमच्या घोषवाक्यातच आमच्या फर्मच्या कार्याचं गुपित लपलं आहे. निसर्ग संपन्न असलेल्या राजापूर तालुक्यात आमच्याकडे म्हणजेच नवजीवन एग्रो सपोर्ट सर्व्हीसेस एन्ड कन्सल्टन्सी या फर्मतर्फे विक्रीसाठी काही शेतजमिनी उपलब्ध आहेत. कोकणातील शेती आणि किफायतशीर नगदी पीकांची शेती, मसालाशेती या विषयांची आवड असलेल्या श्री. महेश पळसुलेदेसाई या तरूण तडफदार व होतकरू युवकाने या फर्मतर्फे आपल्या उद्योजकतेला वाव दिला आहे. नवजीवन एग्रो सपोर्ट सर्व्हीसेस एन्ड कन्सल्टन्सी म्हणजे कोकणातील करारशेतीसाठी विश्वसनीय नांव. आम्ही आपण गुंतवणूक केलेल्या शेतजमिनीवर आपल्या सांगण्यानुसार किंवा आपल्या अभ्यासानुसार किंवा आमच्या सल्ला सेवेच्या माध्यमातून व्यावसायीक शेती प्रकल्प साकार करून देतो. आमच्यासोबत कामकाज असे चालेल........

आपण आमच्या फर्मच्या माध्यमातून आपल्या बजेटनुसार जमिन खरेदी करायची, जमिन तुमच्या नांवे होणार, 7-12 व खातेउतारा तुमच्या नांवे होणार, जमिनीचे मूळ टायटल व मालकी तुमचीच असणार, मात्र या जमिनीवर जर शेती किंवा काही किफायतशीर पीके घ्यायची असतील तर आपण आपल्या गुंतवणूकीला जीवंत करू शकता, म्हणजेच तुम्ही नफ्याची शेती करू शकता. आपल्या शेतीसाठी आमच्यातर्फे आपणाला खालील मदत मिळेल...
1 ) आपल्या शेतीसाठी म्हणजेच आपण खरेदी केलेल्या जागेसाठी आपल्या बजेटनुसार व आपल्या मनात असलेल्या विकसन संकल्पनांनुसार आम्ही विकास आराखडा तयार करून देऊ.
2) आपल्या शेतीसाठी संपूर्णपणे विकास आराखड्यानुसार आम्ही आपणाला मनुष्यबळ पुरवठा करू. आपल्या शेतीची देखभाल व निगा व संरक्षण आम्ही करून आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवून आपल्या शेताची राखण आम्ही करू.
3) आपल्या शेतातील शेतमाल आपल्या सूचनांनुसार आपल्यासाठी पाठवू किंवा त्याची किफायतशीरमार्गाने विक्री करून मार्केटींग करून देऊ.

कोकणबाग संकल्पना

गंध कोकणमातीचा त्याने आकाश कोंदले,
धरतीचे गंधगाणे निळ्या नभात गोंदले..

( कवीवर्य विद्याधर करंदिकर – कणकवली जि. सिंधुदुर्ग )

कोकण हा प्रांत आपल्या वनराजीने आणि निसर्गसौंदर्याने अवघ्या जगाला वेड लावणारा प्रदेश आहे. याच कोकणात एक स्वप्न साकार होत आहे. या स्वप्नाचं नाव आहे कोकणबाग, कोकणबाग निवांतनिवास. जमिन खरेदी करून कोकणात व्यावसायीक शेतीसाठी गुंतवणूक किंवा निवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करण्यासाठी निवांत जागा जेथे आहे तो कोकणबाग निवांत निवास. या कोकणबागेत आपण आपल्या मनाप्रमाणे शेती करू शकता. आपणाला या कोकणबागेत आपल्या मनाप्रमाणे शेती उत्पादन करणे आमच्या सहकार्याने शक्य होईल.

संडे फार्मर क्लब –
आपण शहरातील धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टी मनात असतानाही करू शकत नाही. अशा शहरी व परगावी किंवा परदेशात वा परराज्यात राहत असलेल्या मध्यमवर्गीय तसेच गुंतवणूकदार उद्योजकांसाठी ही योजना आहे. या योजनेत आपण शेतजमिन खरेदी करून आपण मनाप्रमाणे विकसन करू शकता. सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार वा रविवारी आपण आपल्या शेताच्या देखभाल निगेसाठी येऊ शकता. अशा योजनेला संडे फार्मर क्लब म्हणजेच सुट्टीच्या दिवशी येऊन शेती करणारे लोक ज्या योजनेत आहेत ती संडे फार्मर क्लब योजना.

स्पाईस गार्डन – ( पैशाला सुगंध मसाल्याचा )
कोकणातीलच नव्हे तर सर्वत्र शेतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. हवामानावर अवलंबून असलेली शेती न करता शाश्वत शेती म्हणजे मसाल्याची शेती. काळी मिरी, नारळ, जायफळ, कोकम, अननस, वेलची, दालचिनी आदी मसालापीके घेत खात्रीशीर व हमखास पीके देणारी शेती म्हणजेच मसाल्याची शेती. पारंपारिक आंबा व काजू तसेच निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेली शेतीपद्धत्ती बदलून केला जाणारा हा अभिनव प्रकल्प आहे. या प्रकाराच्या शेतीसाठी व प्रकल्पासाठी मान्यवर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

वनशेती – ( माझी शेती बांबूची, खैराची शेती )
कोणत्याही प्रकाराची गुंतवणूक न करता, पाणी, वीज, कुंपण अशी फार खर्चिक गुंतवणूक न करता आपण वनशेती करू शकतो. या वनशेतीचा प्रकल्प म्हणजेच वनशेती माझी शेती. या प्रकारच्या प्रकल्पासाठी आम्ही आपणाला पडिक व साधी जमिन देऊ शकतो.

कॅशक्रॉप फार्मींग – नगदी पीकांची शेती
आम्ही या पर्यायात आमच्या गुंतवणूकदारासाठी फायद्याची शेती करून देण्यासाठी कामकाज करू शकतो. अल्पकालावधीत पीके देणारी जसे पपई, शेवगा, फुलशेती, फळभाज्या आदी पर्यायांची निवड करून आपल्या प्रकल्पावर कामकाज केले जाईल.

आमची वैशिष्ट्ये

1) करार शेतीला सामाजिक जोड व रोजगाराभिमुख शेती
2) रासायनिक खते, फवारण्या व विषारी किटकनाशके यांच्या वापराविना आरोग्यदायी शेती
3) गुंतवणूकदाराला त्याची मालकी व हक्क ठेवून लाभदायक शेतीचे पर्याय
4) मान्यवर तज्ज्ञ, शास्त्रज्ज्ञ, यांच्या मार्गदर्शनासह गुंतवणूकदाराच्या शेतमालाचे यशस्वी मार्केटींग करून देण्यासाठी कटीबद्ध
5) शेती, शेतकरी, ग्राहक या सर्वांसाठी रोजगाराभिमुख अभिनव सामाजिक व व्यावसायीक प्रकल्प.


आमच्याबाबत.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण या प्रगतीशील गावातील श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांनी या फर्मची स्थापना केली आहे. स्वतः श्री. महेश नवजीवन विकास सेवा संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षपदावर असल्याने विविध सेवाभावी कार्याशी अगदी जवळून संबध रोजचाच आहे. मात्र शेती व गोवंशसंवर्धन या क्षेत्रात कार्य करताना
Read More...

 

आमच्या सेवा

  • खरेदी केलेल्या जमिनीच्या विकसनाबाबतीत सल्ला व सेवा पुरविणे.
  • खरेदी जमीनीवर विविध प्रकारच्या नगदी ( कॅश ) पीकांसाठी सल्ला देऊन ती पीके घेण्यासाठी सेटअप पुरविणे.
  • जमीनीवर पीके घेताना तज्ज्ञ मंडळींकडून विविध सल्ले जे दिले जातात
  • Read More...

Connect with us