पूर्ण झालेले प्रकल्प

पूर्ण झालेले प्रकल्प

आमच्या ओशीवळे येथील “ कोकणबाग ” या प्रकल्पात आजवर आलेल्या ग्राहकांनी स्वतःचे कामकाज सुरू केले, शेतीउत्पादने घ्यायला सुरूवात केली, या सर्वांच्या गुंतवणूकीतून कोकणबाग साकार झाली. आमच्या कोकणबागेतील नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस & कन्सल्टन्सी या फर्मकडे असलेल्या प्रकल्पांची थोडक्यात संक्षिप्तपणाने माहिती

इनामदार गार्डन्स एल.एल.पी. ( ७ एकर २ गुंठे ):

अ ) विदिशा गार्डन्स १.- राजापूर तालुक्यातील ओशीवळे या गावातील आमच्या फर्मचा हा पहिला प्रकल्प ! आज सात एकर दोन गुंठे जागेवर असलेल्या या प्रकल्पातील ३५० वेंगुर्ला ७ जातीच्या काजूकलमांसह ५० वेंगुर्ला ४ कलमे आणि नारळाची झाडे, छोटे टुमदार शेतघर, विहीर, ६३ के.व्ही. क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि घरासमोरची फुलबाग सारं कसं लक्षवेधक आहे. या प्रकल्पाला विदिशा गार्डन्स १ असे नाव आमच्या ग्राहकांनी दिलेले आहे. या प्रकल्पाच्या कुंपणाच्या कडेने “ लक्षद्वीप ” या जातीच्या नारळांची लागवड केलेली आहे. दोन नारळाच्या मधल्या जागेत दालचिनी कलमे लागवड केलेली आहे. सर्व उपक्रमासाठी आमच्या प्रकल्पाच्या मालकांनी भारत सरकार कंपनी मंत्रालयाकडून “ इनामदार गार्डन्स एल.एल.पी. ” ही कंपनी नोंदणीकृत करून बागेचे व्यवस्थापन नवजीवन फर्मकडे दिलेले आहे.

ब ) विदिशा गार्डन्स २. - इनामदार गार्डन्स एल.एल.पी. कंपनीचा हा दुसरा प्रकल्प “ विदिशा गार्डन्स ” २ या नावाने आमच्या नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस & कन्सल्टन्सी या फर्मने मालकांच्या सांगण्यानुसार व आमच्या सल्ला सेवेनुसार साकार केलेला आहे. ३ एकर ६ गुंठे जागेवर हा प्रकल्प साकार केलेला आहे. १४५ नारळाची झाडे ( बाणावली व टी.डी. ), नारळाला कडक उन्हाची बाधा होऊ नये म्हणून सफेत वेलची केळीची नारळाच्या चारही बाजूने लागवड केलेली आहे. नारळासोबत जायफळ, दालचिनी, या मसालापीकांची पद्धतशीर लागवड केलेली आहे. कुंपणाच्या कडेने वैविध्यपूर्ण फळझाडे लावलेली आहेत. या प्रकल्पस्थळी विहीर, पाण्याच्या प्रत्येकी पाच हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्या, अखंड वीज, छोटे शेतघर, अशी पायाभूत सुविधांची सोय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण जागेला कोकणातील जांभा दगड म्हणजेच लाल चिरा सहा फूटी कंपाऊंड घातलेले आहे.या प्रकल्पात एक एकर जागा खास विविध प्रयोगांसाठी मोकळी ठेवलेली आहे. या मोकळ्या चौरस प्रयोगभूमी या नात्याने मोकळ्या जागेत इनामदार गार्डन्सतर्फे सर्वाधिक आकर्षण ठरलेले स्ट्रॉबेरी पीक कोकणात आम्ही यशस्वीपणे घेतले. पाच गुंठे क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीचा प्रयोग, वीस गुंठे क्षेत्रावरील काकडी लागवड प्रकल्प, जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळात घेतलेले इंद्रायणी, आंबेमोहोर तांदळाचे पीक या आमच्या यशदायी प्रयोगांनी विदिशा गार्डन्स दोन या प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. सध्या २०२० साली एक एकर क्षेत्रावर सूर्यफूल व भुईमूग ( जात टी.ए.जी. २४ ) या पीकाची एक एकरवर लागवड केलेली आहे.

Vidisha Garden

Inamdar Garden

Coconut Plant

Banana Farm

परांजपे गार्डन्स ( ९ एकर्सचा एकात्मिक प्रकल्प )

ठाणे येथील श्री. परांजपे या गृहस्थांच्या ९ एकर जमीनीत परांजपे गार्डन्स हा प्रकल्प साकार झालेला आहे. काजू, आले लागवड, विहीर, जंगली जनावरांपासूनच्या संरक्षणार्थ विद्युत कुंपण अशा विविध वैशिष्ट्यांसह हा फलोत्पादन प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पावरील विविध कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

पॅराडाईझ फार्म्स ( ५ एकर्सचा प्रकल्प )

ओशीवळे येथील “इनामदार गार्डन्स” या प्रकल्पाच्याच शेजारी असलेला हा पाच एकरचा प्रकल्प “पॅराडाईज फार्म्स” ३ एच.पी.ची विद्युत पंप जोडणी, लाल जांभ्या चि-यांचे कुंपण, विविध फळझाडे यांचेसहीत असलेला हा प्रकल्प मुख्य रस्त्याला लागूनच आहे, कुणाचेही लक्ष वेधून घेणारा व मोक्याच्या जागेवर असलेला हा प्रकल्प नवजीवन फर्मच्या कोकणबागेच्या व्यवस्थापनाकडे आहे.

वसंत-स्मिता प्रोजेक्ट ( २ एकर ११ गुंठे क्षेत्र )

भोपाळ ( मध्य प्रदेश ) येथील मालक असलेल्या या प्रकल्पावर सोनचिवा या जातीच्या बांबूची लागवड केलेली आहे. सुमारे ९०० बांबू कंदांची लागवड होऊन हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. प्रकल्पाचे क्षेत्र २ एकर ११ गुंठे आहे. ओसाड व ओबडधोबड जागेवर लागवड कशी होऊ शकते याचे हे एक उदाहरण आहे.

ऋताशा प्रोजेक्ट ( ५ एकर्स क्षेत्रावरील एकात्मिक प्रकल्प )

श्री. जयदिप आपटे यांच्या या प्रकल्पावर विविध फलोत्पादन लागवडीचे नियोजन असून हा प्रकल्प सध्या पर्यवेक्षणाखाली असून काही निरीक्षणे चालू आहेत. या प्रकल्पाचे क्षेत्र पाच एकर बारा गुंठे आहे.

उपाध्ये जंगल फार्म्स ( २ एकर २१ गुंठे क्षेत्रावरील जंगल फार्म्स प्रकल्प )

पुणे येथील श्री.सौ उपाध्ये दांम्पत्याचा हा प्रकल्प कुणीही काही नवे शिकावे असा आहे. दोन एकर एकवीस गुंठे क्षेत्रावरील या प्रकल्पात केवळ जंगलाचे संवर्धन केलेले आहे. या जमीन क्षेत्रावर जे.सी.बी. चालवून जमीनीचे व जंगलाचे चकोट करणे, प्राण्यांचे निवारे नष्ट करणे, लगेचच काजू, हापूसची शेती करणे वगैरे किफायतशीर हव्यासाच्या मागे न जाता केवळ जंगलांचे संवर्धन करण्याचा संकल्प केलेल्या या दांम्पत्याच्या प्रकल्पाने एक वेगळाच आदर्श उभा केलेला आहे.

औरंगाबादकर – कुंटे – सोनलकर फार्म्स ( ८.५ एकर्सचा कोकण फार्म्स )

अत्यंत मोक्याच्या जागेवर वसलेला हा फलोत्पादन प्रकल्प या नात्याने लवकरच साकार होत आहे. या प्रकल्पाची सल्ला सेवा नवजीवन ऍग्रो या फर्मकडे आहे. बारमाही वाहते पाणी असलेल्या ओढ्यालगतच असलेली व रस्त्याच्या कडेची जमीन या प्रकल्पासाठी संबंधित मालकांनी घेतलेली आहे. सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या व अभ्यासाच्या वाटेवर आहे.

रायपाटण फार्म्स ( ३.५ एकरवरील काजू बाग )

मु.पो. रायपाटण येथे असलेला हा वेंगुर्ला ४ या जातींच्या काजू कलमांचा प्रकल्प आहे. “ रायपाटण फार्म्स ” या शेतावर काजू, आवळा, हापूस या फळपीकांची लागवड आहे.

शेंड्ये बाग ( ३८ गुंठे क्षेत्रावरील हापूस बाग )

रायपाटण येथे असलेली एक छोटीशी बाग एवढीच ओळख या प्रकल्पाला नसून एका महिलेने जिद्दीने उभारलेला हापूस कलमांचा हा प्रकल्प आहे. कोणे एके काळी पार बाद झालेल्या जागेवरील व रया गेलेल्या हापूस झाडांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मेहनत व निगराणी करून या बागेची उभारणी नवजीवन फर्मने केलेली आहे. अवीट चवीच्या कोकणच्या हापूसची चव ही या बागेची खासीयत आहे.

युगंधरा गार्डन्स ( २.५ एकर्स जागेवरील हापूस बाग )

डोंबीवली येथील श्री. बापट कुटुंबियांच्या या “ युगंधरा गार्डन्स ” या अडीच एकर जागेत सुमारे १२६ हापूस कलमे आहेत. अवीट चवीच्या मधुर हापूसची ही बाग असून या बागेतील पाहूस फळे सर्व महाराष्ट्रभरात चोखंदळ खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत. या बागेचे व्यवस्थापन नवजीवनकडे आहे.

Yugandhara Garden
Yugandhara Garden