आपल्या जमीन खरेदीसाठी आमचे सक्षम पर्याय

आपल्या जमीन खरेदीसाठी आमचे सक्षम पर्याय

१) १०० एकर्स क्लब सभासद. ( हंड्रेड एकर्स फार्म क्लब )

"कोकणबाग"

सुमारे दहा वर्षापूर्वी आम्ही नवजीवन टीमने पाहिलेलं हिरवं स्वप्नं ! आम्ही स्वप्नं पाहिलं, तेव्हा आमच्या पायाखाली व्यवस्थापनासाठी एक एकरही जमिन नव्हती. आज तब्बल दहा वर्षानंतर आम्ही ६५ एकरच्या आसपास आलो आहोत. आमच्याकडे ११ सभासद आहेत. ठाणे, भोपाळ, पुणे, मुंबई, सिंगापूर, डेन्मार्क, दुबई अशा पार सातासमुद्रापार निवासाला असलेल्या सदस्य जमिनदार मंडळींनी आमच्या नवजीवन टीमवर विश्वास दाखवला आणि आमच्याकडून जमिन खरेदी केली, आमच्या कोकणबागेचं सभासदत्व घेतलं.....अन् आता सत्यात उतरलेल्या कोकणबागेचा सभासद म्हणून ही मंडळी अभिमानाने उल्लेख करतात तेव्हा आमचा उर भरून आल्याशिवाय राहत नाही.

आपणही आमच्या हंड्रेड एकर्स क्लबचे सदस्य होऊ शकता. आपण किमान अर्धा एकर ते जास्तीत जास्त दोन एकर किंवा आपल्या बजेटनुसार जमीनखरेदी करावी अन् पुढील सारी जबाबदारी आमच्यावर सोपवावी अशी आमची ही योजना ! आजवर ज्यांनी आमच्याकडे शेती खरेदी केली त्यांची शेतं बहरली, फुलली, फळली आणि आता आकाराला येऊ लागली कोकणबाग ! आपणही आमच्या या कोकणबाग परिवारात जमीन खरेदी करून सदस्य होऊ शकता, आपणही आपल्या संकल्पनेतील शेती आमच्या सक्षम परिवाराला सांगून करवून घेऊ शकता. आपल्यासाठी आमच्याकडे विविध शेतजमीन खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपणाला आमचे हे अगत्याचे निमंत्रण समजा...चला तर मग....केव्हा होताय आपण हंड्रेड एकर्स क्लबचे सभासद ?

२) संडे फार्मर्स क्लब

( परगावातील, किंवा उद्योगव्यवसाय, नोकरी सांभाळून शनिवार, रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी शेतीउद्योग सांभाळणा-यांची संपन्न शेती संकल्पना, अशा शेतक-यांचा समूह ) आम्ही आमच्या “ संडे फार्मर्स ” क्लबमध्ये अशा सदस्यांचा समावेश करतो की ज्यांना दरदिवशी किंवा काही दिवस शेतीत यायला जमत नाही. शनिवार किंवा रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जी मंडळी शेतात रमतात त्यांच्या शेतीचा क्लब म्हणजे संडे फार्मर क्लब ! कोकण रेल्वेने आता गावं जवळ आली. तेजस एक्स्प्रेस सारख्या आधुनिक वेगवान रेल्वे गाड्या असोत किंवा राजधानी सेवा असो, भारताच्या कानाकोप-यातून आपण कोकणातील शेती दिवसभरात गाठू शकतो.

( प्रो.प्रा. महेश यानी दिल्ली, अहमदाबाद, अमृतसर, चेन्नई आदी एअरपोर्टवरून पणजीला येऊन सायंकाळच्या कोकणकन्या ट्रेनने आपलं शेत गाठलेलं आहे. ) कोकणरेल्वे आणि विमानसेवा लवकरच कोकणात हातात हात घालून चालतील असं चित्रं आहे. आपल्या शेतावर जर अशाप्रकारे दिवसभरात येता आलं तर पुढील दोन सुट्टीचे दिवस शेतावर घालवा, सर्व उपक्रमांत समरस होऊन सहभाग घ्या, आपल्या शेतावरच्या कामकाजात सहभाग घ्या, शेती समजून उमजून करा ही संकल्पना संडे फार्मर्स सदस्यांना आम्ही देतो. आपणालाही या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी आमचे आग्रहाचे निमंत्रण आहे.

३) आई-बाबा दत्तक कृषि-परिवार

वृद्धाश्रमाला आधुनिक पर्याय हवा, शेतीसाठी मार्ग नवा

ज्यांची मुले मुली किंवा नातेवाईक परगावी, परदेशी आहेत, आई बाबा किंवा थेट रक्ताच्या नात्यातील काका काकू किंवा पालक घरी एकांतवासात असतील, त्यांना किंवा त्यांची काळजी ज्यांना वाटते अशा पाल्यांसाठी ही आमची अभिनव योजना आहे. आपण आपल्या पालकांसाठी जमीन खरेदी करा आणि निश्चिंत रहा. आपले आई बाबा, आपले पालक आम्ही दत्तक घेऊ, त्यांची काळजी घेऊ, त्यांना शेतीउत्पादनात आणि कोकणातील शेतीत, कोकणातील शेतघरात विरंगुळा देऊन त्यांची काळजीही घेऊ असा आमचा हा नविन उपक्रम ! आमच्या कोकणबाग परिवाराला नेहमीच चौकशीचे फोन येत असतात त्यातील अनेकजणांनी आपल्या पालकांसाठी आम्ही काय करू शकतो याची चौकशी केली, आम्ही यासाठी आमची दत्तक पालक योजना तयार केली आहे. आपण आपल्या पालकांसाठी जमीन खरेदी करा, आपले पालक आम्हाला दत्तक द्या या योजनेत आपले स्वागत आहे. ( या योजनेतील सहभागासाठी आमच्या नियम, अटी, जसे - आई-बाबा बेड रिडन नसावेत, अशा काही पूर्वअटी लागू असतील. )

४) स्पाईस गार्डन क्लब

कोकणातील सुपीक मातीत मसालाबाग प्रकल्प, पैशाला सुगंध मसाल्यांचा

कोकण म्हणजे साक्षात केरळ, मद्रास, तामिळनाडू....! कोकणातील मातीत नारळ, सुपारी, फणस व कोकम यासह मसालाशेती चांगली फळते, फुलते व बहरते. मसालाशेती हा कोकणातील आंबा, काजू, भातशेतीला सक्षम पर्याय आहे हे सिद्ध झालेले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विविध प्रयोग आणि अभ्यास प्रकल्पांच्या मदतीने सप्रमाण पटवून दिलेले आहे की कोकणात मसालाशेती होऊ शकते. कोकणातील कित्येक शेतकरी आपल्या परसदारी नारळ, सुपारी झाडांवरती काळीमीरी वेल चढवतात. कोकणातील जमीनखरेदीत मसालाशेती प्रकल्प ही नविन संकल्पना कोकणबाग परिवाराने गुंतवणूकदारांना सुचवली. आमच्याकडे आता आमचे सदस्य मसालाशेती प्लॉट तयार करून देण्याचा आग्रह धरतात तेव्हा आम्हाला आनंद वाटतो की आमची मसालाशेतीची संकल्पना गुंतवणूकदारांना पसंत पडते आहे.

आम्ही आपण खरेदी केलेल्या जमिनीत काळीमीरी, दालचिनी, जायफळ, वेलची, लवंग, नारळ, सुपारी आदी मसालापीके यांची शेती मसालाबाग प्रकल्प करून देऊन साकार करून देऊ शकतो. आपणाला लाखीबाग हा कोकण कृषि विद्यापीठाने यशस्वी केलेला प्रयोगही आपल्या मसालाबागेत करता येऊ शकतो. गरज आहे आपल्या इच्छाशक्तीची, आपल्या संयमाची, वादळ, वारा पाऊस किंवा प्रतिकूल हवामान यांना तोंड देणारी मसालाबाग शेती आपल्या गुंतवणूकीच्या खरेदी केलेल्या शेतजमीनीत होऊ शकते. आपणाला अशा एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक करायची असेल तर आपणाला "स्पाईस गार्डन"

हा जमीन खरेदी केल्यावरचा पर्याय सर्वोत्तम आहे.