कणीदार “संपूर्ण शुध्द तूप”

कणीदार “संपूर्ण शुध्द तूप”

देशी गाईच्या नैसर्गिक दूधापासून निर्मिती केलेले नैसर्गिक पध्दतीने केलेले, पारंपारिक संपूर्ण तूप आपल्या भारतीय गाईला आयुर्वेदाने फार मानाचे स्थान दिलेले आहे. गाईच्या तूपाला तर आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र आपणाला सध्या बाजारात प्राप्त होणारे तूप हे यंत्रावर केलेले असते. क्रीम सेपरेटर यंत्रावर कच्या दूधावर प्रक्रीया करुन किंवा अन्य पध्दतीने तूप तयार केले जाते. आम्ही आमच्या गोशाळेत भारतीय गीर जातीच्या दुधाळ गाई पाळतो.

pure ghee

या भारतीय गाई पौष्टीकता व सकसता यासाठी जगप्रसिध्द आहेत. भारतीय गाईचे दुध एटू या गटातील आहे. साधारणतः 1993 सालापर्यंत जगाला भारतीय गाव व युरोपीयन गाय यातील फरक माहित नव्हता. 1993 साली न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञ बॅब इलीयाट यांनी भारतीय गाईच्या दूधाचे सर्वश्रेष्ठत्व शास्त्राच्या कसोटीवर सिध्द केले. जगाला यावेळी (1993 साली) A1 म्हणजे विषारी वा पुतना मावशीचे दूध व A2 म्हणजे अव्दीतीय दूध वा अमृतमुल्य दूध याचे महत्व कळाले. आज आपणाला भारतीय गाईच्या दूधाचे महत्व पुरेसे अजुनही कळालेले नाही. भारतीय गाईच्या दूधापासून केलेले तूप कोलॅस्टेरॅलला निमंत्रण देत नाही. आयुर्वेदाच्या अनेक औषधांसाठी गाईचे तूप गरजेचे असते. आम्ही आमच्या गोशाळेतील गायींपासून काढलेल्या दूधाला शेणाच्या गोवरी, लाकडे यावर तापवून भाकरीसारखी घट्ट साय काढतो.

लाकडी खांबाला चिनी मातीच्या बरणीत व माठात घुसळून लोणी काढले जाते. हे लोणी 10 ते 15 वेळा स्वच्छ धुवून त्यापासून कणीदार तूप तयार केले जाते. तुप तयार करताना स्वच्छतेचे नियम, गुणवत्ता नियंत्रण यासाठी काटेकोर लक्ष पुरविले जाते. आम्ही सर्व दूधाला सायीसह विरजण लावतो. (काहीजण फक्त सायीला विरजण लावतात.) संपूर्ण तूप हे नाव यामुळेच आहे. हे तूप आरोग्याला उपायकारक आहे. शरीराची प्रतिकारशक्ती भारतीय गाईच्या तूप सेवनाने वाढते. तूप खाणे व रुप येणे ही लोकभाषेतील उक्ती आपणाला माहीत आहेच. आपण आम्हाला आपल्या घरी पवित्र मंगल विधी, मंगलसंस्कार, काही खास भोजन प्रसंग असेल तर वा औषधासाठी आमच्याकडून आपण तूप मागवू शकता.