slider slider slider slider slider slider slider slider slider slider

"शेतीला नविन जाग – कोकणबाग"

जमीन मालक तुम्ही व विकासक आम्ही – पैशाला सुगंध मसाल्याचा

कोकणात शेतजमिनीत गुंतवणूक करून फलोत्पादन पीके किंवा व्यावसायीक शेती करण्याची इच्छा असलेल्यांना आम्ही शेतजमीन खरेदीत सहकार्य करतो. असावे फार्महाऊस आपले छान अशी रम्य कल्पना ज्यांची, ज्यांची आहे त्यांना आम्ही शेतघर ( फार्महाऊस ) विकसीत करून तर देतोच पण आम्ही त्याची देखभालही करतो.

कोकणातील महत्त्वाकांक्षी युवक प्रो.प्रा. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई या युवकाने कोकणबाग ही अभिनव संकल्पना विकसीत केली आहे. जगभरातील किंवा जगाच्या कानाकोप-यातील कोणत्याही कृषिप्रेमी, पर्यावरणप्रेमी, गावाकडच्या शेतीशिवाराची ओढ असलेल्या कुणालाही शेतजमिनीच्या खरेदीसह कोकणात शेती करायला व कसायला श्री. महेश पळसुलेदेसाई याची आघाडीची फर्म म्हणजे ‘‘ नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस ऍन्ड कन्सल्टन्सी ” या फर्मचे नाव विश्वासाने आणि खात्रीने घेतले जाते.

खरेदी केलेल्या गुंतवणूकदाराच्या जमिनीत मालकाच्या संकल्पनेप्रमाणे शेतजमिनीचे आम्ही विकसन करून देतो. हापूस आंबा, काजू, कोकम, नारळ, विविध मसालापीके या पीकांसहीत व्यावसायीक भाजीपाला पीके घेऊन शेतजमिनीचे विकसन करून देणे आणि करबचतीसह गुंतवणूकीला फळती, फुलती, बहरती करणे ही संकल्पना कोकणबागेच्या केंद्रस्थानी आहे.


महेश पळसुलेदेसाई प्रोफाईल नवजीवन ऍग्रो फर्मची व्हीजन्स
about

आमच्या योजना

कोकणबाग संकल्पना

गंध कोकणमातीचा त्याने आकाश कोंदले,
धरतीचे गंधगाणे निळ्या नभात गोंदले..
- ( कवीवर्य विद्याधर करंदिकर – कणकवली जि. सिंधुदुर्ग )

कोकण हा प्रांत आपल्या वनराजीने आणि निसर्गसौंदर्याने अवघ्या जगाला वेड लावणारा प्रदेश आहे. याच कोकणात एक स्वप्न साकार होत आहे. या स्वप्नाचं नाव आहे कोकणबाग, कोकणबाग निवांतनिवास. जमिन खरेदी करून कोकणात व्यावसायीक शेतीसाठी गुंतवणूक किंवा निवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करण्यासाठी निवांत जागा जेथे आहे तो कोकणबाग निवांत निवास. या कोकणबागेत आपण आपल्या मनाप्रमाणे शेती करू शकता. आपणाला या कोकणबागेत आपल्या मनाप्रमाणे शेती उत्पादन करणे आमच्या सहकार्याने शक्य होईल.

आमची वैशिष्ट्ये

  • 1) करार शेतीला सामाजिक जोड व रोजगाराभिमुख शेती
  • 2) रासायनिक खते, फवारण्या व विषारी किटकनाशके यांच्या वापराविना आरोग्यदायी शेती
  • 3) गुंतवणूकदाराला त्याची मालकी व हक्क ठेवून लाभदायक शेतीचे पर्याय
  • 4) मान्यवर तज्ज्ञ, शास्त्रज्ज्ञ, यांच्या मार्गदर्शनासह गुंतवणूकदाराच्या शेतमालाचे यशस्वी मार्केटींग करून देण्यासाठी कटीबद्ध
  • 5) शेती, शेतकरी, ग्राहक या सर्वांसाठी रोजगाराभिमुख अभिनव सामाजिक व व्यावसायीक प्रकल्प.

आमची उत्पादने

प्रशंसापत्र