कोकणबाग पीके – पीकपद्धती

कोकणबाग पीके – पीकपद्धती

आम्ही आपणाला आमच्याकडे खरेदी केलेल्या जमिनीत खालील पीके घेण्याची शिफारस करतो –

फलोत्पादन पीके

१) हापूस आंबा २) काजू ३) कोकम ४) फणस ५) नारळ ६) पपया ७) केळी ८) चिकू ९) पेरू १०) आवळा ११) अननस

नोंद – कोकणातील हवामानात सहजगत्या फळधारणा होत असलेली ही फळपीके आहेत. या फळांच्या जाती, लागवडखर्च, पीकपद्धत, शासन अनुदान, नफाक्षमता आदी अन्य तपशील आमच्या अनुभवानुसार आणि आमच्या मान्यवर तज्ज्ञांनी शिफारस केल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प अहवाल तयार करून आमच्या सन्माननीय ग्राहकांना त्याप्रकारे शेत तयार करून देतो.

भाजीपाला पीके

१) पडवळ २) दोडका ३) काकडी ४) तोंडली ५) कारली ६) लालभोपळा ७) दुधी भोपळा ८) वाल ९) चवळी १०) लालमाठ ११) मुळा १२) कोथिंबीर १३) भेंडी १४) कलिंगड १५) स्वीटकॉर्न ( मधुमका )

नोंद – आम्ही शिफारस केलेली भाजीपालापीके आमच्या फर्मतर्फे आम्ही प्रायोगिक व व्यावसायीक तत्वावर करून त्याचे मार्केटींग केल्यानंतरच येथे सुचवलेली आहेत याची नोंद घ्यावी. आमच्याकडे येणा-या कोणत्याही सन्माननीय ग्राहकांना जर याप्रकारच्या व्यावसायीक शेतीत किंवा आपल्या दैनंदिन गरजांसाठी अशाप्रकारची फळभाजीची शेती करायची असेल तर आम्ही तशाप्रकारचा भाजीमळा तयार करून त्याप्रकारचे किफायतशीर प्रकल्प तयार करून देऊ शकतो.

फुलशेती

१) झेंडू २) शेवंती ३) गुलछडी ४) लीली

कोकणातील हवामानात केवळ तीव्र उन्हात होणारी फुलपीके आम्ही सुचवतो.

वनशेती

१) सागवान २) बाबूं ३) शिवण ४) शिसम / शिसव ५) चंदन

स्पाईस गार्डन ( पैशाला सुगंध मसाल्याचा )

कोकणातील हवामान थेट केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यांच्या पंक्तीतले आहे. कोकणातील हवामानात मसाल्याची पीके उत्तम येऊ शकतात. केंद्रीय मसाला संशोधन केंद्र आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मसाला या विषयावर विपुल संशोधन झालेले आहे. कोकणात विविध ठिकाणी आकर्षक व किफायतशीर मसालाशेतीच्या बागा तयार झालेल्या आहेत. अशाप्रकारातील मसालाबागेची संकल्पना आम्ही स्पाईस गार्डन ही संकल्पना विकसीत केलेली आहे. आम्ही विकसीत केलेल्या संकल्पनेतील मसालाबागेत खालीलप्रकाराची लागवड आम्ही शिफारस करतो.
१) नारळ २) काळीमिरी ३) जायफळ ४) वेलची ५) दालचिनी ६) केळी ७) पपई ८) कोकम ९) अननस

( आमच्याकडे शेती खरेदी करणा-या सन्माननीय ग्राहकांना मसालाशेतीचे विकसीत मॉडेल आम्ही तयार करून देऊ शकतो. )

नोंद – आमच्या संकल्पनेतील विविध शेतीच्या संधीसंदर्भातील, शेतजमीन विकसनाबद्दल आमच्या दृष्टीकोनाला विस्ताराने समजावून देणारा लेख “ साद देती शेतीच्या संधी ” हा आमच्या ब्लॉगवरील विस्तृत लेख आपण शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी जरूर वाचावा अशी विनंती आहे.

वनौषधींची शेती

कोकणचा पश्चिम घाट हा वनौषधींच्या वैविध्यपूर्ण जातींनी व प्रकारांनी समृद्ध आहे. यातील कित्येक वनौषधी आपण शेतीत करू शकतो. वनौषधी महामंडळाकडून या शेतीसाठी किमान ४० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदानही आहे. वनौषधी पीकांमध्ये माका, तुळशी, सागरगोटा, कळलावी, अर्जुना, कडुलिंब, ब्राह्मी, शतावरी, कोरफड अशा शेकडो वनस्पतींचा समावेश करता येऊ शकतो. आम्ही आपल्या विस्तृत माहितीसाठी सोबत वनौषधी महामंडळाची वेबसाईट माहितीसाठी लिंक करून दिलेली आहे.