संकल्पना

संकल्पना

कोकणातच नव्हे तर सर्वत्र मजूर टंचाई व शेतीची ओढ कमी होत असताना कोणी शेताकडे आनंदाने वळताना दिसत नाही. मात्र काही कंपन्या जेव्हा करारशेती किंवा गावाकडे काही नवा प्रकल्प उभारतात तेव्हा अनेकांना त्या प्रकल्पावर रोजगार हवा असतो. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना त्यातील सुरक्षितता व पगाराची खात्री हवी असते. अशा पार्श्वभूमीवर आम्ही खालील संकल्पनेवर कार्यरत आहोत. कोकणसह महाराष्ट्रात व देशात शेती व शेतीपूरक व्यवसायात उत्कृष्ट सल्ला व सेवा पुरवून त्या प्रकल्पाला अथवा शेताला उत्तम उत्पादनक्षम करणे. विविध सेवा व आधार देत संबधित प्रकल्प पूर्णत्वाला नेऊन कार्याची सर्वोत्तमता दर्शवित प्रकल्पाला नवजीवन देणे.

नमुना कोकणबाग प्रकल्प

आपणाला नमुना कोकणबाग प्रकल्प रायपाटण या गावी पहायला मिळेल. आपणाला या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आमच्याशी संपर्क करून अगोदर वेळ ठरवून यावे लागेल. आपण कृपया तशी कल्पना आम्हाला द्यावी म्हणजे दळणवळणासाठी ते सोईचे ठरेल. कोकणबाग प्रकल्प - आराखडा. – कोकणबाग प्रकल्पाच्या आराखड्याचे कामकाज चालू आहे. मात्र आम्ही सध्या चालू असलेल्या कार्याचे साधारण अंदाज यावा या नात्याने सादरीकरण केले आहे.

पर्याय – क्रमांक १ - आपण आमच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी नक्की केल्यावर सर्व बाजूंची छाननी झाल्यावर एकदाच रक्कम भरा. ५ वर्षे किंवा १० वर्षे आमच्याशी करार करा. निश्चिंत रहा. आपली बाग व्यावसाईक पद्धत्तीने उत्पादन देण्यास सुरूवात करील त्याच वर्षी आपली दुसरी टर्म सुरू होईल. आपण फक्त या पाच वा दहा वर्षांसाठी एकदाच रक्कम भरायची. उत्पादनक्षम बाग आपल्या हातात.

पर्याय – क्रमांक २ - या पर्यायात आपण जमीन खरेदी कराल. आमच्याशी आराखडा सल्ला व सेवा घेऊन कराल. पुढे प्रत्येक खर्च व कामकाज अंदाजपत्रक, कोटेशन, वर्क ऑर्डर या पद्धत्तीने करीत स्वतःच स्वतःच्या बागेला साकार कराल. आपण प्रत्येक कामकाज स्वतःच्या मनाप्रमाणे व आपल्या सोईप्रमाणे देखरेख करीत साकार कराल.

पर्याय – क्रमांक ३ - या पर्यायात आपण आमच्या योजनेप्रमाणे सुलभ हफ्त्यांत रक्कम भराल. १२ तसेच १८ किंवा २४ किंवा ३६ सलग हफ्त्यांत रक्कम भरायची. आपली बाग आपण शेवटचा हफ्ता भरताच नांवे करून घ्यावयाची. आपण मालकच फक्त रक्कम सुलभ पद्धत्तीने.

पर्याय – क्रमांक ४ - आम्ही संपूर्णपणे तुमच्या गरजा तसेच तुमची मनोधारणा लक्षात घेऊन बाग तयार करणार. आपण तयार व रेडीमेड उत्पादनक्षम बाग खरेदी करायची. सेवाशुल्क आपल्यातील चर्चेनुसार.

सामूहिक शेतघर

कोकणातील खेडे व गाव म्हटलं की गावाचे गावपण आपल्या नजरेसमोर येते. आपल्या या विकसनांत आपण आपल्या प्रकल्पांत सामूहिक शेतघर साकार करून देतो. आपल्या प्रकल्पांत समजा ५ वा ७ किंवा ९ ते १० मालक जरी असले तरी सर्वजण एकाच वेळी येऊ शकत नाहीत. यासाठीच सर्वांच्या सोईने आपण टुमदार व सर्व सोईंनी युक्त सामाईक शेतघर विकसन करणार अशी संकल्पना आहे. या शेतघरासह कोकणातील शेतात आपली स्वतःची गाय अशी संकल्पना करीत आम्ही सामूहिक गोशाळा साकार करणार आहोत. ( स्वमालकीचे व स्वतंत्रच शेतघर जर हवे असेल तर तशीही आमची स्वतंत्र योजना आपल्या भेटीला आणीत आहोत. )