Reading Habit

Reading Habit

शालेय शैक्षाणिक साहित्य वितरण, गरजूंना मदत 'वयम' आणि 'साधना' या बाल विशेष अंकाचे "वसा वाचनाचा" उपक्रमाअंतर्गत संपूर्ण कोकण विनामूल्य वितरण, आर्थिक साक्षरता, संगणक तंत्रज्ञान प्रशिक्षण, ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन आदी उपक्रमांसाठी नावाजलेली स्वयंसेवी संस्था.

निसर्गासंपन्न आणि समृद्ध असलेल्या रत्नगिरी जिल्ह्यातील धडपडणाऱ्या युवकांच्या व शिक्षकांच्या चळवळीला आलेलं मृत स्वरूप म्हणजे 'नवजीवन विकास सेवा संथ'. रायपाटण या राजापूर तालुक्यातील प्रगतशील गावांत संस्थेची २६ नोव्हेंबर २००९ नोदणीकृत होऊन स्थापना झाली. (रजि.नं.३९३१/महाराष्ट्र-रत्नागिरी) सुरुवातीच्या काळात म्हणजे १९९९ ते २००४ दरम्यान 'आर्यादुर्गा' अभ्यास परिवार या नावानं इ.४ थी व इ.७ वी शिय्शावृत्ती परीक्षांसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक प्रबोधन, जाणीव जागृती व्याख्याने, पार्श्नापात्रिका निर्मिती आदी उपक्रम संस्थेने केले. शिक्षण आणि शेती ही दोन क्षेत्रे संस्थेच्या केंद्रस्थानी असून 'शिक्षणाकडून शेतीकडे व शेतीतून शिक्षणाकडे ' अशी संस्थेची मनधरणी आहे. बदलत्या कोकणच्या पार्श्वभूमीवर उप्तादक आणि नगदी पिंकांच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, दत्तक गाव, भारतीय गोवंश संवर्धन, संगणक व्यवहार आणि आनंददायी प्रकाल्पधारित शिक्षण या माध्यमातून संस्था समाजाला सोबत घेत वाटचाल करीत आहे.

  • सांगली येथील लुल्ला ट्रस्ट आयोजित सेवा २०१५ मधील सहभाग.
  • रायपाटण शाळा नं.१ येथील शालेय साहित्य वितरण.
  • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष श्री.तानाजीराव चोरगे यांची संस्थेला भेट.
  • पुणे येथील गोपालन कार्याशालेतील सवांद.
  • विश्वनाथ विद्यालय राजापूर येथील वयम व साधन अंकाचे वसा वाचनाचा उपक्रमातील वितरण.
  • नानावटी रुग्णालय व इंडिअन ऑईल मुंबई यांचेसह आयोजित रायपाटण येथील रुग्णसेवा शिबीर.

Library

Library

शिक्षण

ज्ञान दिल्याने वाढते – सत्य शिवाहून सुंदर, त्या ज्ञानाचे मंदिर हे! कोकणातील गावागावातून बदलत्या शिक्षणपद्धतीचे प्रतिबिंब शाळाशाळात पडते. चकाचक देखण्या, सुंदर शाळा, चैत्यन्याने रसरसलेल्या उत्साही, आनंदी मुलांचे परिसर विकास प्रकल्प, या सर्वांमधून ज्ञानमंदिरे संगणक आणि तंत्रज्ञान युगाला सामोऱ्या जात आहेत. रेल्वेत बसण्याची असो व विमानांत बसण्याची, आधुनिक प्रकल्पात वा बँकात नोकरीपासून उद्योजग घडवण्याची क्षमता, पात्रता ज्या शिक्षणामुळे येते त्या शिक्षण पद्धतीत काही नावे उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • देवळातील फारशी, सोन्याचा कळस याप्रमाणे शाळेतील संगणकही गरजेचा ह्या मनोधाराणेसाठी पालक प्रबोधन शिबीर घेणे.
  • २१ व्या शतकात आधारीत ज्ञानाधारीत तंत्रज्ञान युगात भारत महासत्ता बनणार हे गृहीत धरून पाटीवर, भिंतीवर, कागदावर जश्या रेघोट्या, फराटे, अक्षरं उमटतात तशी करामत संगणकावर व्हावी यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी संगणक शिबीर आयोजन करणे.
  • तणावविरहित – पारंपरिकता सोडून 'धोका व ओका' ही चाकोरी मोडून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, आनंददायी उपक्रमांचे चान्दावार्गांचे आयोजन करणे.
  • पालकांचे दबाबगट, प्रभोदनगट, संस्कार शिबिरे, विज्ञान प्रदर्शने आदी उपक्रम आयोजन करणे.
  • स्पर्धा परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षा या विशेष उपक्रमांतून विद्यार्थ्यांना आधुनिक स्पर्धाम्तक युगासाठी तयार करणे.
  • बदलेल्या तंत्रज्ञानानुसार वेगवान युगातही मातृभाषा संगणकांवर सहजगीत्या वापरण्यासाठी मुलांना, पालकांना तयार करणे, शिक्षकांसाठी 'युनिकोड', 'इनस्क्रिप्ट किबोर्ड, वपर प्रशिक्षण आयोजित करणे.
  • विज्ञान जागृती, विज्ञानजाणीव, वाचनमाला, निबंधलेखन कार्यशाळा आदी उपक्रम तज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने आयोजीत करणे.