कोकणातील राजापुर तालुक्यातील रायपाटण गावातील नवजीवन विकास सेवा संस्थेच्या मार्फत संस्था सक्षमीकरणासाठी हा विश्वसनीय अभिनव उपक्रम सादर करीत आहोत. रुपये पाच हजार, सात हजार, दहा हजार मात्र रक्कम संस्थेला देणगी देऊन कायमस्वरुपी एक हापूस आंबापेटी, विनामूल्य वाहतूक प्रवासखर्चासह घरपोच देण्याची योजणा आहे. ही योजना म्हणजे कोणतीही गुंतवणूक योजना, व्याजाची हमी दामदुप्पट देणारी स्कीम, मल्टीलेव्हल मार्केटींग स्कीम नव्हे. कोकणातील स्वयंसेवी आणि सेवाभावी नवजीवन सेवा संस्था (रजि.न.महा.३९३१-एफ ३११८ २००९)या नोंदणीकृत संस्थेच्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी, प्रकल्पांसाठी निधी – दान योजना आहे. कोकणबाग - आमराई – व्हाया कोकणब्रीज या योजनेत संस्थेचे देणगीदार, हितचिंतक आमच्या संस्थेचे पालक, सल्लागार, सध्याचे ग्राहक यांना सहभागी होता येईले.
विनीयोग संस्थेने या देणगीतुन दोन आमराई कोकणात राजापुर तालुक्यात रायपाटण या गावी तयार करण्याचे नियोजन आहे. यापैकी एका बागेचे कामकाज सुरूही झालेले आहे. 5000 हापूस आंबा कलमांची बाग या निधीतून करण्याचे नियोजन केले आहे. संकल्पना – कोकणतून देवगड (सिंधुदुर्ग), रत्नागिरी या दोन ठिकाणांहुन जगभरात हापूस आंबा पाठवला जातो. कोकणातील हापूस आंबा म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, मात्र हापूस आंबा पेटीचे दर नेहमीच सर्वसामान्यांच्या पार आवाक्याबाहेर असतात. आंबा सीझनच्या अगदी शेवटालाही रु. 300 ते रु. 500 प्रती डझन दर असतो. कर्नाटकी हापूसची भेसळ तर नित्याचीच गोष्ट आहे. सर्वसाधारणतः खालील 4/5 बातम्या वेगवेगळ्या स्वरुपात, विविध प्रकारे आपण पाहतो – वाचतो – ऐकतो आणि सांगतो... हापूस आंबा आणि बातम्या
यातील बातम्यांतून तथ्य असो नसो. फळांच्या राचाचे आगमन होताच अन्य फळांचे बाजारभाव गडगडतात. आसमंतात हापूसचा मन धुंद करणारा, वेडावणारा सुगंध दरवळतो. प्रत्येक खवैय्यांचे आंबा फळाशी नाते अगदी घट्टच! या सर्वांचा विचार करुनच नवजीवन विकास सेवा संस्थेने हापूस आंबा बाग ‘आमराई’ कोकणबाग नावाने आपल्या परिवारासमोर आणली आहे.
अ.क्र. | भरावयाची रक्कम | आंबापेटी मिळण्याची मुदत | फळांची संख्या | उपलब्ध सेवा व सवलती |
---|---|---|---|---|
१ | रु.५०००/- अक्षरी पाच हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग १२ वर्षे | एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ४ वर्षे चार डझन पेटी – ३ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर १५% |
२ | रु.७०००/- अक्षरी सात हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग १५ वर्षे | एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ५ वर्षे चार डझन पेटी – ५ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर २०% |
३ | रु.१०,०००/- अक्षरी दहा हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग २० वर्षे | एक डझन पेटी – ६ वर्षे
दोन डझन पेटी – ६ वर्षे चार डझन पेटी – ८ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने M.R.P. वर २५% सूट व प्रवासखर्चासह घरपोच मिळतील. |