नाही. नवजीवनची मनुष्यबळ सेवा पुरवठा ही कामाची पद्धत आमच्या वीस कि.मि. परिघपुरती मर्यादित आहे. आमच्या सल्ला सेवा माध्यमातून खरेदी केल्या जात असलेल्या जमिनीसाठी व प्रकल्पांसाठी आम्ही ही सेवा देतो.
नवजीवन एग्रो सपोर्ट सर्व्हीसेस एन्ड कन्सल्टन्सी ही फर्म शेती विकसन प्रकल्पांसाठी प्रकल्प आराखडा तयार करणे, खरेदी झालेल्या जमिनीवर पीकांची लागवड, पेरणी करून देणे, मशागत, व्यवस्थापन, मनुष्यबळ पुरवठा करणे, आलेल्या पीकांची साठवण व विक्री करून देणे, हाती आलेल्या पीकांचे आवश्यकतेनुसार मूल्यवर्धन करणे आदी सेवा आमच्या फर्ममार्फत दिल्या जातात.
आमच्या फर्मच्या माध्यमातून खरेदी केल्या जात असलेल्या शेतजमिनीत आम्ही पारंपारिक हापूस आंबा व अन्य आंबा पीकाच्या जाती, काजू, आवळा, चिकू, कोकम, नारळ, विविध मसाला पीके, पपई, शेवगा व अननस, हळद, वेलवर्गीय व भाजीपाला पीके आदी पीके घेण्यासाठी मदत केली जाते.
नाही. नवजीवन मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या शेती प्रकल्पांसाठी नवजीवनकडून कोणतीही आर्थिक वा भांडवली गुंतवणूक केली जात नाही.
होय. आम्ही कृषि पर्यटन प्रकल्प साकार करण्यासाठी मान्यवर सल्ला सेवा एजन्सीसह अशा पर्यटन प्रकल्पांसाठी विविध प्रकारची मदत करू शकतो. अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी लागणारी जमिन आम्ही आमच्या भागात देऊ शकतो.
प्रश्न क्रमांक मध्ये सांगितलेल्या पीकांसाठी आमच्या मार्फत खरेदी केलेल्या जमिनीत उत्पादनाची क्षमता चांगली असते. कोकणात होत असलेली व कोकण कृषि विद्यापीठाने संशोधन करून ज्याबाबतीत निष्कर्ष प्रकाशित केले आहेत अशीच पीके आमच्यामर्फत सुचविली जातात.
आमच्या फर्मचा विषमुक्त व फवारणीविरहीत नैसर्गिक शेतीवर व गाय गोशाळा आधारित शेतीवर जास्त विश्वास आहे.
गोशाळा आधारित व गाय केंद्रस्थानी ठेवून केली जाणारी नैसर्गिक शेती ही विषमुक्त तसेच विविध रासायनिक फवारणी विरहीत शेती आहे. या शेतीमध्ये शेतासाठी गायीचे पंचगव्य वापरले जाते. आध्यात्मिक आणि यज्ञीय शेती अशी ही संकल्पना आहे. आमच्या जमिन खरेदीदाराने या पद्धत्तीचा आग्रह धरल्यास आम्ही ही पद्धत सुचवतो.
आहे. आंबा व काजू, आवळा, अननस, शेवगा, पपई या पीकांवर मूल्यवर्धन करून उत्पादन वाढ साध्य करता येते, आंबा रस, काजूगर निर्मिती, काजू सरबत, लोणची, मुरांबा, जॅम, जेली, पानांची पावडर, तेल निर्मिती आदी प्रकारचे मूल्यवर्धन करून शेती किफायतशीर करण्याच्या योजना नवजीवनकडे आहेत.
होय. आमचे जमिन खरेदी करणारे ग्राहक वाढल्यास सर्वांशी विचारविनिमय करत आम्ही आमच्या ग्राहकांच्या शेतावरील शेतमालाची निर्यात करण्याचा मानस बाळगून आहोत.
आमच्या परिसरातील बचतगट, बेरोजगार युवक, परिसरातील कुशल कारागीर व प्रशिक्षित मंडळी यांचा वापर आमच्या प्रकल्पातील कामांसाठी केला जाणार आहे.
आमच्या शेतीच्या विकास प्रकल्पांवर गरजेनुसार व कायमस्वरूपी स्थानिक मंडळींना रोजगार दिला जाणार आहे. ग्रामस्थांना या इथे काहीतरी घडत आहे असा विश्वास मिळाला तर आम्हाला ग्रामस्थांचे सहकार्य चांगले मिळणार आहे.
नाही. नवजीवन फर्म आपली सल्ला व सेवा फी आकारून कामकाज करण्यात स्वारस्य़ ठेवून काम करते. आम्ही गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीतून निर्माण झालेल्या नफ्यात हिस्सा मागत नाही.
आम्ही आमच्या फर्ममार्फत खरेदी केलेल्या जमिनीसाठी काही कायदेशीर सल्ला सेवा सुचवतो, यामुळे कोणत्याही प्रकारे मूळ मालकीला धक्का लागत नाही व अतिक्रमण होत नाही.
होय. आमच्या फर्ममार्फत खरेदी केल्या जात असलेल्या शेतजमिनींसाठी सार्वजनिक व खाजगी बॅंकांच्या शेतीविकास कर्जयोजना उपलब्ध आहेत. या कर्जयोजनांचा लाभ आमचे ग्राहक घेऊ शकतात. शासनाच्या अनुदानाच्या योजना ज्या असतील त्यांचाही लाभ घेता येऊ शकतो.