आमच्या कोकण बागेतील एक सन्माननीय भागीदार डॉ. आठवले आहेत. आमच्याकडून त्यांना मिळालेल्या सेवा आणि त्यांचा अनुभव ते नेहमीच इतरांना सांगत असतात यासाठी आम्ही संचालक मंडळाने त्यांना सन्माननीय भागधारक या नात्याने मंडळावर घेतलेले आहे. आमच्या प्रकल्पाची ध्येयधोरणे, आमच्या प्रकल्पातील रोजगारनिर्मिती, कोकणातील सुखनिवास पर्यटन याबद्दल ते त्यामुळेच अधिरवाणीने सर्वांना सांगू शकतात.
आमच्या फर्म मार्फत आमच्या कोकणबाग निवांत निवास प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या प्रकल्पाचाच एक भाग असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रदीप आठवले (डोंबिवली, ठाणे) यांच्याबद्दल डॉ. आठवले यांना करिअर कौन्सेलिंग या विषयाचा गाढा अभ्यास व अनुभव असून ते त्याबाबतीत करिअर कौन्सेलर आहेत. भारतातील व भारताबाहेरील संधी या विषयावर ते इय्यत्ता ९ वी ते १२ वी या वयोगटातील विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी ते कार्यरत आहेत. डॉ. प्रदीप आठवले कार्डीक मेट्रोपॉलीटीन युनिव्हर्सिटी (लंडन) या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूल (कर्जत, मुंबई, महाराष्ट्र) या कॉलेजसाठी वरिष्ठ सल्लागार या नात्याने कार्यरत आहेत.
नवजीवन संस्थेडून मी २०१४ साली ३ एकर शेतजमीन खरेदी केली. त्या जमिनीत आम्ही रत्नागिरी हापूस आंबा आणि काजूचे पीक घेतले. त्यात भरघोस यश मिळाले. त्यानंतर माझे मित्र संतोष सोनलकर आणि एक जवळचे नातेवाईक अशा आम्ही तिघांनी मिळून आणखी ५ एकर जमीन खरेदी केली. त्यातही काजू आणि आंब्याचे पीक घेतले. निसर्गरम्य वातावरण, अस्सल कोकणातील कायदेशीर बाबींनी परिपूर्ण जमीन असल्याचे खूप समाधान वाटते. महेश पळसुलेदेसाई यांच्या नवजीवन संस्थेचा मी पहिलाच ग्राहक. महेश हे अत्यंत विनम्रपणे, पद्धतशीरपणे, सर्व कायदेशीर, प्रशासकीय बाबींची इत्यंभूत माहिती देऊन व्यवहार पूर्ण करतात. तेवढेच नव्हे तर व्यवहारानंतरही त्यांनी आमच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपलं आहे. त्यामुळेच तर आमच्या संपूर्ण ८.५ एकर जमिनीचे संपूर्ण व्यवस्थापन वगैरे त्यांच्याकडे सोपवून आम्ही निश्चिंत असतो.
माझा आणि महेशचा परिचय आमची आंबाबाग घेतांना झाला. आमच्या बाबांनी बाग घ्यायची इच्छा बोलून दाखवणे व महेशची फेसबुकची पोस्ट माझ्या वाचनात येणे हा एक योगायोग होता. जमीन खरेदी हा एकतर फार गुंतागुंतीचा विषय, त्यातून दगाफटका होण्याच्याच गोष्टी ऐकलेल्या. या पार्श्वभूमीवर आमची महेशशी भेट झाली. त्याचा शांत पण स्वष्टक्ता स्वभाव, आंबाशेती व्यवस्थापनाची माहिती, जमीन आणि झाडांचे ज्ञान यातून आमचा आंबाबाग घेण्याचा आत्मविश्वास वाढला. त्यात गजाननच्या संभाषण व व्यवहारचातुर्याची भर पडली. आज आमच्या बागेला तीन वर्ष होतील. नवजीवन अॅग्रॊ सर्विसेसने दिलेल्या सेवेबद्दल आम्ही बापट कुटुंबीय अत्यंत समाधानी आहोत.
कोकणात आपली स्वत:ची शेतजमीन असावी, अशी माझी खूप इच्छा होती. पण खात्रीशीर जमीन मिळत नव्हती. अखेर शोध घेता घेता मी रत्नागिरी जिल्ह्यातील नवजीवन ऍग्रो संस्थेचे महेश पळसुलेदेसाई यांच्यापर्यंत पोहोचले. आणि माझा शोध संपला. मी त्यांच्याकडून जवळपास ३ एकर जमीन खरेदी केली. त्यामध्ये माझ्या इच्छेप्रमाणे काही जागेत रत्नागिरी हापूस आंबा लावला तर उर्वरित जागेत बांबूची शेती केली. मी भोपाळमध्ये असल्याने या सर्वांचे व्यवस्थापन अगदी मनापासून, कमीत कमी खर्चात पळसुलेदेसाई करतात. वेळोवेळी शेतीबद्दलची आवश्यक ती माझे सर्व माहिती, कायदेशीर प्रक्रिया, योजनांची माहिती तसेच उत्पादित झालेल्या आंबाबागेचे संपूर्ण व्यवस्थापन, कामगार व्यवस्थापन, आंब्यांची विक्री वगैरे सगळं तेच करतात. मला माझ्या स्वत:च्या कोकणातील आंबाबागेतील अस्सल हापूस आंबा भोपालमध्ये खाण्याचा आनंद मिळतो. याचे सारे श्रेय पळसुलेदेसाई जाते. या व्यवहारापलिकडे जाऊन त्यांच्याशी आता आमचं कौटुंबिक नातं निर्माण झालं आहे.