पॅलीश न केलेला पौष्टीक तांदुळ गोमय शेती आधारित नैसर्गिक शेती करुन केलेला ब जीवनसत्वयुक्त पॅलीश न केलेला पौष्टीक तांदूळ कोकणातीलच नव्हे तर अवघ्या भारतात तांदळापासून केलेला भात हे मुख्य अन्न मानले जाते, मात्र भात (धान) भरडल्यावर तांदूळ पांढरा शुभ्र दिसावा ह्यासाठी त्याला तीन वेळेस पॅलीश केली जाते. या प्रकारात तांदळातील पोषक अन्नसत्वे नष्ट होतात. मुळातच भात पिक जास्त यावे म्हणून रासायनिक खतांचा भडीमार केला जातो. जमिन नापीक होते संस्थेने शेतकरी वर्गात जागृतीसाठी काही कार्यशाळा घेतल्या. आम्ही आमच्या नमूना प्रक्षेत्रावर (50 एकर) भात शेती करण्याचे ठरवून ही भातशेती गोमय आधारीत म्हणजेच गायींच्या शेणखताचा व गोमूत्राचा वापर करुन केली आहे. आम्हाला पिकाच्या उत्पादकतेत फारच फरक पडलेला दिसला.
आमच्या तांदळाचे वैशिष्टे असे की, यात आपणाला ब जीवनसत्व पुरेपूर प्रमाणात मिळते. ब जीवनसत्वाच्या जातकुळीतील उर्वरीत सर्व घटक आपणाला पुरेपूर प्रमाणात मिळतात. यामुळेच थोडासा हातसडीच्या तांदळाचा भात खाल्ला तरी पोट भरल्यासारख वाटतं. पांढराशुभ्र भात कितीही खाल्ला तरी पोट भरण्याची भावना होत नाही ती याच कारणामूळे. आपण पॅलीश करुन त्यातील तमाम जीवनसत्वांचा नायनाट करतो. आम्ही या तांदळाला याचसाठी पॅलीश न करता आमच्या ग्राहकांना देतो. इस्कॅन, विविध दत्तमंदीरे आणि खाजगी ग्राहक आमचा तांदूळ पसंद करतात. डॅ. अभय धुळप (रत्नागिरी) (एम.डी. आयुर्वेद सुवर्णपदक प्राप्त) यांनीही आमच्या तांदळाचा गौरव केला आहे. भात थोडा करडा व चॅकलेटी झाला तरी चालेल. आपण सकस व पौष्टीक खाऊया अशी आपली धारणा असेल तर आपणाला आमचा अनपॅलीश्ड डाईट राईस नक्कीच आवडेल!