कोकणावर मनापासून प्रेम करणा-या अन् कोकणातीलच मातीत जन्म झालेल्या पण
आता पोटापाण्यासाठी परगावी असलेल्या किंवा सातासमुद्रापार असलेल्या बंधू-भगिनी आणि
बांधवांसाठी हा माझा लेख आहे. हा माझा लेख अशांसाठी आहे की ज्यांना कोकणातील शेतीत
निदान आपला खारीचा वाटा असावा असं वाटतं, ज्यांना काही ना काही करण्याची तीव्र इच्छा
आहे, ज्यांना अधून मधून तीव्रतेनं वाटतं की कोकणात जावं अन् निवांतपणे चार आठ दिवस
रहावं त्यांना आम्ही एक स्वतःची जागा देत आहोत. ज्या परगावी स्थित असलेल्या मंडळींना
स्वतःची शेतजमीन घेण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना कोकणबागेत संधी आहे. कोकणबाग समूहात
आपणाला मनपसंत शेतजमीन उपलब्ध होईल. माझ्या लेखाच्या नावातच सावधपणाचा उल्लेख
आलेला आहे. आपण ज्या कोकणावर नितांत प्रेम करतो त्या कोकणात आज जमीन सहजासहजी
हवी तशी उपलब्ध होत नाही. आपली जमीन असली तर त्याची उपज-निपज करणारी व्यवस्थापन
यंत्रणा नसते. आपण आपली गावाकडची जमीन नाईलाजास्तव विक्रीसाठी काढली तर त्याला
लगेचचा व खात्रीशीर ग्राहक नसतो, अशी जमीन ठेवावी तरी अडचण अन् नाही ठेवली तरी
खोळंबा अशा कात्रीत आपण सापडलेलो असतो. या अशा आणि विविध प्रश्नांची सोडवणूक करीत
करीत आम्ही कोकणबाग समूह अतिशय सावध आणि खात्रीशीर वाटचाल करीत करीत सात वर्षे
पूर्ण केलेली आहेत.
समाज अथवा ज्ञाती कोणतीही असो, मालमत्ता खरेदी आणि त्याचे व्यवस्थापन तरूण
वयातच करायला हवे. आयुष्याच्या उतारवयात खरेदी केलेली जमीन, गाडी हवा तसा मनमुराद
आनंद देईलच असे नाही. आयुष्यात जेव्हा धमन्यांतून रक्त सळसळत असते तेव्हाच शेतीत काही
दीर्घकाळाच्या हेतूने लागवडीचे प्रयोग केले तर त्याला यश येण्याची खात्री असते. आम्ही
कोकणबागेतर्फे अशा सावध गुंतवणूकीसाठी सल्ला सेवा पुरवतो. आम्ही शेतजमीन उपलब्ध करून
देतो, आम्ही त्यासाठी सल्ला सेवा देऊन थांबत नाही तर त्यासाठी कामगार व्यवस्थापन पुरवतो,
शेतमालाचे विक्री व्यवस्थापन करून देतो. आमची सल्ला सेवा आपणाला शेतीच्या जमीनीत
कोणती लागवड करावी याबाबतीत सल्ला सेवा आणि सपोर्ट सर्व्हीसेस पुरवते. आपणाकडे तीव्र
इच्छाशक्ती हवी अन् मनात शेतीकडे आशावादी दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन हवा.
कोकणातील शेतीचे तंत्रज्ञान आता बदलत आहे. कोकणातील युवक आणि शेतकरी
नवनविन बदलांना सामोरा जात आहे. भातशेतीच्या कोकणची ओळख स्ट्रॉबेरीचे कोकण व्हावी
इतपत ट्रेंडस आता बदलत आहेत. कोकणातील शेतमालही आता नेहमीच्या पारंपरिक पॅकेजींगपेक्षा
वेगळ्या पॅकेजींगमध्ये बाजारात येतो आहे. या सर्वाकडे परगावातील किंवा परदेशातील
कोकणवासियांनी पहायला हवे आहे. आम्ही या सर्व बदलांकडे फार बारकाईने लक्ष देत पुढील
सावध हाका ऐकत आहोत. कवीवर्य माधव यांच्या ओळी आजही आम्हाला साद घालतात..
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
विक्रम काही चला करू तर.....
Recent Comments