कोकणात शेतजमिनीत गुंतवणूक करून फलोत्पादन पीके किंवा व्यावसायीक शेती करण्याची इच्छा असलेल्यांना आम्ही शेतजमीन खरेदीत सहकार्य करतो. असावे फार्महाऊस आपले छान अशी रम्य कल्पना ज्यांची, ज्यांची आहे त्यांना आम्ही शेतघर ( फार्महाऊस ) विकसीत करून तर देतोच पण आम्ही त्याची देखभालही करतो.
कोकणातील महत्त्वाकांक्षी युवक प्रो.प्रा. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई या युवकाने कोकणबाग ही अभिनव संकल्पना विकसीत केली आहे. जगभरातील किंवा जगाच्या कानाकोप-यातील कोणत्याही कृषिप्रेमी, पर्यावरणप्रेमी, गावाकडच्या शेतीशिवाराची ओढ असलेल्या कुणालाही शेतजमिनीच्या खरेदीसह कोकणात शेती करायला व कसायला श्री. महेश पळसुलेदेसाई याची आघाडीची फर्म म्हणजे ‘‘ नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस ऍन्ड कन्सल्टन्सी ” या फर्मचे नाव विश्वासाने आणि खात्रीने घेतले जाते.
खरेदी केलेल्या गुंतवणूकदाराच्या जमिनीत मालकाच्या संकल्पनेप्रमाणे शेतजमिनीचे आम्ही विकसन करून देतो. हापूस आंबा, काजू, कोकम, नारळ, विविध मसालापीके या पीकांसहीत व्यावसायीक भाजीपाला पीके घेऊन शेतजमिनीचे विकसन करून देणे आणि करबचतीसह गुंतवणूकीला फळती, फुलती, बहरती करणे ही संकल्पना कोकणबागेच्या केंद्रस्थानी आहे.
गंध कोकणमातीचा त्याने आकाश कोंदले,
धरतीचे गंधगाणे निळ्या नभात गोंदले..
- ( कवीवर्य विद्याधर करंदिकर – कणकवली जि. सिंधुदुर्ग )
कोकण हा प्रांत आपल्या वनराजीने आणि निसर्गसौंदर्याने अवघ्या जगाला वेड लावणारा प्रदेश आहे. याच कोकणात एक स्वप्न साकार होत आहे. या स्वप्नाचं नाव आहे कोकणबाग, कोकणबाग निवांतनिवास. जमिन खरेदी करून कोकणात व्यावसायीक शेतीसाठी गुंतवणूक किंवा निवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करण्यासाठी निवांत जागा जेथे आहे तो कोकणबाग निवांत निवास. या कोकणबागेत आपण आपल्या मनाप्रमाणे शेती करू शकता. आपणाला या कोकणबागेत आपल्या मनाप्रमाणे शेती उत्पादन करणे आमच्या सहकार्याने शक्य होईल.
माझा आणि महेशचा परिचय आमची आंबाबाग घेतांना झाला. आमच्या बाबांनी बाग घ्यायची इच्छा बोलून दाखवणे व महेशची फेसबुकची पोस्ट माझ्या वाचनात येणे हा एक योगायोग होता. जमीन खरेदी हा एकतर फार गुंतागुंतीचा विषय, त्यातून दगाफटका होण्याच्याच गोष्टी ऐकलेल्या. या पार्श्वभूमीवर आमची महेशशी भेट झाली. त्याचा शांत पण स्वष्टक्ता स्वभाव, आंबाशेती व्यवस्थापनाची माहिती, जमीन आणि झाडांचे ज्ञान यातून आमचा आंबाबाग घेण्याचा आत्मविश्वास वाढला.
कोकणात आपली स्वत:ची शेतजमीन असावी, अशी माझी खूप इच्छा होती. पण खात्रीशीर जमीन मिळत नव्हती. अखेर शोध घेता घेता मी रत्नागिरी जिल्ह्यातील नवजीवन ऍग्रो संस्थेचे महेश पळसुलेदेसाई यांच्यापर्यंत पोहोचले. आणि माझा शोध संपला. मी त्यांच्याकडून जवळपास ३ एकर जमीन खरेदी केली. त्यामध्ये माझ्या इच्छेप्रमाणे काही जागेत रत्नागिरी हापूस आंबा लावला तर उर्वरित जागेत बांबूची शेती केली.
नवजीवन संस्थेडून मी २०१४ साली ३ एकर शेतजमीन खरेदी केली. त्या जमिनीत आम्ही रत्नागिरी हापूस आंबा आणि काजूचे पीक घेतले. त्यात भरघोस यश मिळाले. त्यानंतर माझे मित्र संतोष सोनलकर आणि एक जवळचे नातेवाईक अशा आम्ही तिघांनी मिळून आणखी ५ एकर जमीन खरेदी केली. त्यातही काजू आणि आंब्याचे पीक घेतले. निसर्गरम्य वातावरण, अस्सल कोकणातील कायदेशीर बाबींनी परिपूर्ण जमीन असल्याचे खूप समाधान वाटते. महेश पळसुलेदेसाई यांच्या नवजीवन संस्थेचा मी पहिलाच ग्राहक.
आमच्या कोकण बागेतील एक सन्माननीय भागीदार डॉ. आठवले आहेत. आमच्याकडून त्यांना मिळालेल्या सेवा आणि त्यांचा अनुभव ते नेहमीच इतरांना सांगत असतात यासाठी आम्ही संचालक मंडळाने त्यांना सन्माननीय भागधारक या नात्याने मंडळावर घेतलेले आहे. आमच्या प्रकल्पाची ध्येयधोरणे, आमच्या प्रकल्पातील रोजगारनिर्मिती, कोकणातील सुखनिवास पर्यटन याबद्दल ते त्यामुळेच अधिरवाणीने सर्वांना सांगू शकतात.