अभिनव आंबा लागवड योजना

अभिनव आंबा लागवड योजना

कोकणबाग आंबा लागवड योजना ही सामूहिक सहभागाची, सर्वांच्या म्हणजेच कोकणातील हापूस आंब्यावर निरतीशय, निस्सिम प्रेम असलेल्या खव्वैयांनी स्वतःच्या देणगीतून साकार करावयाची आमराई योजना आहे. या अभिनव आंबा लागवड, हापूस कलम लागवड योजनेसाठी सहभाग घेताना किमान रु. 5000/- (रुपये पाच हजार मात्र) तर कमाल रु. 10,000/- (रुपये दहा हजार मात्र) रक्कम सर्वप्रथम भरावी लागेल. पुढे सहभागी व्यक्तींना बारा वर्षे, पंधरा वर्षे, विस वर्षे एक आंबा पेटी विनामूल्य प्रवास खर्चासह घरपोच मिळणार आहे.

Mango Planting

नियम व अटी

 • या योजनेत कोणत्याही भारताय व अनिवासी भारतीय नागरीकाला पर्यायात दिलेल्या रक्कमेतील रक्कम भरुन सहभागी होता येईल.
 • या योजनेत सहभागी होणा-या व्यक्तीला ही रक्कम “नवजीवन विकास सेवा संस्था” (नोंदणी क्रमांक महाराष्ट्र 3931/एफ.3918 रत्नागिरी/2009) यांना देणगी म्हणून सदर रक्कम भरावी लागणार आहे.
 • कोकणबाग आमराई ही अभिनव हापूस आंबा कलम लागवड योजना ही कोणत्याही स्वरुपाची गुंतवणूक योचना, व्याजरक्कम प्रदान करणारी योजना, सभासत्व योजना नसून कोकणातील “नवजीवन विकास सेवा संस्था” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी व बळकटीकरणासाठी निधी संकलन योजना आहे हे मान्य असलेल्या सामाजिक जाणिवेच्या व्यक्तींनाच या योजनेत सहभाग दिला जाईल.
 • “कोकणबाग आमराई, कोकणगेट व्हाया कोकणब्रीज थेट” ही अभिनव हापूस आंबा कलम लागवड योजना मर्यादित काळासाठी असून बारा वर्षे, पंधरा वर्षे, वीस वर्षे अशी या योजनेची मुदत राहणार आहे.
 • संयोजकांनी निश्चित केलेल्या पर्यांयांपैकी एक पर्याय निवडून त्यानुसार सदर रक्कम संस्थेला देणगी देऊन या योजनेतील सहभाग निश्चित करता येईल.
 • या अभिनव हापूस आंबा कलम लागवड योजनेतील सहभागी सभासदाला/व्यक्तीला त्याने दिलेल्या रक्कमेची पोचपावती लगेच संस्थेमार्फत दिली जाईल.
 • या योजनेतील सहभागानंतर नवजीवन विकास सेवा संस्थेमध्ये सभासदत्व, संचालकपद किंवा निर्णय प्रक्रियेत सहभाग, निवडणुक, आदी प्रकारे लाभ होणार नाही.
 • या अभिनव हापूस आंबा कलम लागवड योजनेतील सहभागी देणगीदाराला संस्थेला वार्षिक अहवाल, मागील वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल आँडीट रिपोर्टस आदी सर्व माहीती मागणीनुसार दिली जाईल. मात्र सदर माहितीसाठी संबधित देणगीदाराने आपली विनंती लेखी, तोंडी, मेसेज व ईमेलने केली पाहीजे. सदर माहिती अहवाल संस्थेच्या कार्यालयात विनामूल्य पहावयाला उपलब्ध असेल. पोस्टाने हवी असेल तर पोस्टेज शुल्क भरून घेऊन त्यानंतरच दिली जाईल.
 • अट क्रमांक आठ मध्ये नमूद केलेली माहीती इलेक्ट्रानिक स्वरुपात स्कॅन केलेली असून ती वेबसाईटवक सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
 • या योजनातील एकाच कुटुंबातील कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही जणांना सहभाग घेता येऊ शकतो.
 • या योजनातील सहभागी व्यक्ती एकाच कुटुंबातील असतील वर नव्हे व राहण्याचे पत्ते वेगवेगळे असतील तर प्रत्येकाचा स्वतंत्र निवासाचा पत्ता देणे सहभागीवरती बंधनकारक राहील.
 • या योजनेतील सहभागी व्यक्तीने आपला पत्ता, दुरध्वनी क्रमांक, घरी असण्याच्या वेळा आदी संपर्क व संवादाचा दुवा प्रतिवर्षी मार्च महीन्यात निश्चित करून घ्यावयाचा असेल.
 • या योजनेतील सहभाग सभासद देणगादारांना या योजनेत देऊ केलेल्या आंबा पेटीव्यतिरीक्त अन्य काही उत्पादने किंवा सुविधा विनामूल्य मिळणार नाहीत.
 • या योजनेतील सहभागी झालेल्या सभासद देणगादार व्यक्तीला कृषीपर्यटन संस्था भेट, भोजन किंवा वाहनव्यवस्था आदी सर्व स्वखर्चाने शुल्क देऊन करावे लागेल. योजनेत नमूद केलेल्या आंबा फळांशिवाय अन्य कोणत्याही उत्पादने विनामूल्य उपलब्ध नसतील.
 • या योजनेतील सहभागी झालेल्या देणगीदाराला मुदत संपताच योजनेतून बाहेर पडावे लागेल. यानंतर योजना चालू ठेवणे किंवा बद करणे संयोजकाच्या निर्णयावर अवलंबून असेल.
 • या योजनेतील सहभागी झालेल्या देणगीदाराचा या हापूस आंबा लागवड योजनेतील जमीन, पाणी किंवा कोणत्याही स्थावर मालमत्तेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मालकी संबध वा अधिकार राहणार नाही.
 • या योजनेची सर्वस्वी अंमलबजावणी ही संयोजक संस्थेची जबाबदारी असणार आहे. या योजने विरोधात तक्रार करणे, अपप्रचार करणे अशा कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होणार नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सहभाही व्यक्तीला द्दावे लागेल.
 • या योजनेतील सहभागी झालेल्यांना, सर्व मंडळींना, सदस्यांना प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे आंबापेटी देणे बंधरकारक असेल तरी भिषण वादळ, अवकाळी पाऊस, आटोक्यात व नियंत्रणात न आणता येणारे रोग, नियंत्राणाबाहेरील विचित्र हवामान आदी कारण घडून आंबाफळे आलीच नाहीत तर योजना त्या वर्षापुरती स्थगीत राहील.
 • या योजनेतील सहभागी देणगीदाराने जर आपल्या वाट्याची फळे व आंबा रस डबा जर कोणा अन्य व्यक्तीला, सभासदाला किंवा अनाथालय, सामाजिक संस्था, मंदिर संस्था – पुजारी, रिमांडहोम, रुग्णालय आदी ठीकाणी देण्यासाठी सुचवले तर संयोजक संस्था तशा प्रकारची व्यवस्था करील.
 • या अभिनव आंबा लागवड योजनेत सहभाग घेतलेल्या व्यक्तीला 15 एप्रिल ते 30 मे या कालावधीत त्या व्यक्तीने दिलेल्या पत्तावर आंबा पेटी पोहोच केली जाईल.
 • या योजनेतील सहभागी झालेल्या कमाल 5000 वा प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींची निवड सोडत रुपात, संगणकावर सोडत काढून एकूण कमीत कमी पाच व जास्तीत जास्त नऊ पाळ्यांमध्ये वितरण पूर्ण केले जाईल.
 • सोडत व नावांची यादी वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. या शिवाय संबधित व्यक्तीला दूरध्वनी, व्हाटस्अप, फेसबूक आदी माध्यमातून संपर्क केला जाईल. (मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता संबधित व्यक्ती परगावी गेली किंवा संबधिताने काहीही न कळवता, कोणताही संवाद साधला नाही तर संस्था त्याची जबाबदारी घेणार नाही.)
 • या योजनेतील सहभागी झालेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव सहभाग रद्द करता येणार नाही. मात्र आपले सभासदत्व हस्तांतरीत केले जाऊ शकते. या प्रक्रीयेची माहीती संबधित व्यक्तीने संस्थेकडे देणे बंधनकारक राहील.
 • या योजनेत सहभाग घेतलेल्या व्यक्तीने परस्पर सांमजस्य करारपत्र () सही व साक्षांकीत करुन घेणे बंधनकारक राहील. या परस्पर सांगजस्य करारपत्रकाची प्रत संयोजक संस्था व सहभागी व्यक्ती या दोहोंकडे राहील.
 • या योजनेत सहभाग घेणा-या व्यक्तीते छायाचित्र, त्या व्यक्तीचा अनुभव आदी संयोजक नवजीवन विकास सेवा संस्था या योजनेच्या प्रसिध्दीसाठी खाजगी किंवा सार्वजनिकरीत्या वापर करु शकेल. काही अपवादात्मक कारणामुळे असे नको असेल तर तसे संबधिताने कळवणे बंधनकारक असेल.
 • ही कोकणबाग आमराई अभिनव हापूस आंबा कलम लागवड योजना आपण सहभाग घेतल्यापासून सलग बारा, पंधरा, वीस वर्षे सुरू राहील व तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र की जे शासनाच्या नोटरी किंवा तहसीलदार यांचेसमक्ष करुन सत्यप्रत केलेली असेल, त्यावर या योजनेच्या अमंलबजावणीकार संयोजक श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांची साक्षरी व फोटो यासह सहभागी देणगीदाराला देणगी रक्क्म पोहोच होताच सात दिवसांतच दिले जाईल.
 • कोकणबाग आमराई या योजनेतील स्थावर जमिन ही मालक व जमीनदार श्री. लक्ष्मण केशव पळसुलेदेसाई व कुटुंबियांची असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी पंचवीस वर्षे विनामुल्य व कोणत्याही जाचक अटी व शर्ती, नियम न घालता नवजीवन विकास सेवा संस्थेला लागवड करा-उत्पादन घ्या व परत करा अशा अटीवर पंचवीस वर्षे कराराने दिली आहे. (कराराची प्रत कार्यालयात उपलब्ध असून ती केव्हाही प्रत्यक्ष भेटीत पाहता येईल.)
 • कोकणबाग हापूस आमराई या अभिनव आंबा कलम लागवड योजनेतील आंबी बागेतून येणारे उत्पन्न हे नवजीवन विकास सेवा संस्थेच्या बळकटीकरणासाठी वापरले जाईल.
 • कोकणबाग आमराई या योजनेतील वर्षे 21 ते 25 या कालावधीत संपूर्ण उत्पादन नवजीवन विकास सेवा संस्था स्वतःसाठी वापरणार असुन त्या उत्पन्न रक्कमेतून संस्था स्वतःच्या विविध सेवाभावी प्रकल्पांना व उपक्रमांना खर्चाची तरतूद करील.
 • या कोकणबाग आमराईबाबत कोणताही न्यायालयीन विषय निर्माण होणार नाही मात्र एखाद्या अपप्रवृत्तीने काही तसा विषय झालाच तर तो राजापुर व रत्नागिरी न्यायालय कार्यकक्षेत सोडवला जाईल.
 • योजनेचा कार्यकाळ संपल्यावर 25 वर्षांनतर सदर कोकणबाग आमराई मूळ जमीन मालकाला परत केली जाईल व प्राप्त तत्कालीन परिस्थीतीनुसार निर्णय घेतला जाईल.

(वरील सर्व सेवा प्राधान्याने आमच्याकडे खरेदी केलेल्या जमिनमालकांना देणे हे आमचे ध्येय आहे. अन्यत्र या सेवा गरजेप्रमाणे व संबधित जमीनमालकांशी झालेल्या किंवा होईल त्या कराराप्रमाणे पुरविल्या जातील. )

अ.क्र. भरावयाची रक्कम आंबापेटी मिळण्याची मुदत फळांची संख्या उपलब्ध सेवा व सवलती
रु.५०००/- अक्षरी पाच हजार मात्र रक्कम भरल्यापासून सलग १२ वर्षे एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ४ वर्षे
चार डझन पेटी – ३ वर्षे
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर १५%
रु.७०००/- अक्षरी सात हजार मात्र रक्कम भरल्यापासून सलग १५ वर्षे एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ५ वर्षे
चार डझन पेटी – ५ वर्षे
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर २०%
रु.१०,०००/- अक्षरी दहा हजार मात्र रक्कम भरल्यापासून सलग २० वर्षे एक डझन पेटी – ६ वर्षे
दोन डझन पेटी – ६ वर्षे
चार डझन पेटी – ८ वर्षे
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने M.R.P. वर २५% सूट व प्रवासखर्चासह घरपोच मिळतील.